News: मुंबईतील आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर विरोधी पक्षांनीही गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांचं म्हणणं आहे की, कायद्यापुढे सर्व समान असतात. मग तो सामान्य माणूस असो वा आमदार. सरकारने यावर कठोर कारवाई करून कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट तक्रार करण्याची गरज नाही, असं सांगितलं. पोलिस स्वतःहून कायदेशीर कारवाई करतील, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर, मरीन लाईन्स पोलिसांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गायकवाड यांनी यानंतरही आपली चूक मान्य न करता मारहाणीचं समर्थन केलं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवला. दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना संजय गायकवाड म्हणतात, मला याचा कुठलाही पश्चाताप नाही अन् मी कशाला घाबरतही नाही. गायकवाड यांनी या मारहाणीचं समर्थन करत सांगितलं की, त्यांनी कर्मचाऱ्याला फक्त "धडा शिकवण्यासाठी" हलकी मारहाण केली.
अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय?
अदखलपात्र गुन्हा हा असा गुन्हा असतो ज्यात पोलिसांना थेट FIR (तक्रार) दाखल करण्याची गरज नसते. याचा अर्थ असा की, पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर त्यांना प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. अशा प्रकारचे गुन्हे साधारणपणे फार गंभीर नसतात. उदाहरणार्थ, किरकोळ मारहाण, छोट्या प्रमाणात फसवणूक किंवा किरकोळ चोरी यासारखे गुन्हे अदखलपात्र मानले जातात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.