Nashik News : सायखेडा भेंडाळी रोडवरील मारुती मंदिर परिसरात गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास कांदा व्यापारी विकास शहा यांच्या कांदा अडतीतील पैसे वाटप करण्यासाठी येत असलेले कर्मचारी गणेश गोवर्धने यांना अडवून त्यांच्यावर हल्ला करीत जवळ असलेले अकरा लाख रुपये घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतु प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने गोवर्धने यांना पाच लाख रुपये आणि दोन चोरट्यांना रोखण्यात यश आले; तर सहा लाख रुपये घेऊन तीन चोरट्यांनी पलायन केले. या संदर्भात सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भेंडाळी शिवारात विकास शहा यांचे कांदा गुदाम आहे. गुदामात सकाळी अकराच्या सुमारास दररोज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जातात. सायखेडा येथील बँकेतून पैसे घेऊन येणारे त्यांचे कर्मचारी गणेश गोवर्धने यांच्या गाडीचा पाठलाग करत स्विफ्टमधून पाच व्यक्तींनी मारुती मंदिर परिसरात यांच्या अल्टो गाडीला कट मारून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाने त्यांना बोलण्यात अडकवून दुसऱ्याने गाडीच्या सीटवर असलेले ११ लाख रुपये घेऊन पळाला.
गोवर्धन यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या स्विफ्ट गाडीला लटकत राहिले. चोरट्यांनी पाचशे फुटांपर्यंत त्यांना ओढत नेले. समोरून काही प्रवाशांनी त्यांनी गाडी आडवी घातली असता, तिघांनी सहा लाख रुपये घेऊन पलायन केले. परंतु पाच लाखांचे बंडल मात्र त्यांच्या हातातून निसटले आणि ते गाडीतच राहिली.
त्यातील दोघांना नागरिकांनी पकडले. संबंधित घटनेची माहिती तत्काळ सायखेडा पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकारे सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता, ते श्रीरामपूर येथील सराईत चोर असून, सलमान आदमाने व नईम मेहबूब असे त्यांचे नाव आहे.
भेंडाळी येथे पोलिस चौकीची मागणी
भेंडाळी हे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने या भागामध्ये सातत्याने चोऱ्या होतात. या ठिकाणी पोलिस चौकी व्हावी, अशी अनेक दिवसांची नागरिकांची मागणी आहे.घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पालवे यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.