Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : गावे उभी करण्यासाठी ‘झेडपी’चे पाठबळ हवे

Rural Leadership : चांगले संवेदनशील अधिकारी लाभले, तर गावांचा कायापालट नक्कीच होऊ शकतो. गावे उभी करण्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पाठबळ हवे असते.

Team Agrowon

Ahilyanagar News : चांगले संवेदनशील अधिकारी लाभले, तर गावांचा कायापालट नक्कीच होऊ शकतो. गावे उभी करण्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पाठबळ हवे असते. कुटुंब, गाव, राष्ट्र निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषद आहेत.

लांगोरे यांनी ३३ वर्षांच्या सेवेत अतिशय समर्पण भावनेने काम करीत ठसा उमटवला. सेवानिवृत्तीनंतरही ते अनुभवाचा उपयोग समाजासाठी करत राहतील, असा विश्‍वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संभाजी व शैलजा लांगोरे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, माजी आमदार दादा कळमकर, माजी सदस्य सचिन जगताप, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाल्या, की लांगोरे हे ग्रामीण भागातून पुढे आल्याने त्यांना गावांच्या समस्यांची पूर्ण जाणीव होती. जिल्हाधिकारी आशिया म्हणाले, की लांगोरे यांच्या अनुभवाचा फायदा ग्राम विकासासाठी होईल, यादृष्टीनेही प्रयत्न करावेत. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी केले. सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादा गुंजाळ यांनी आभार मानले.

प्रामाणिकपणे काम केले : लांगोरे

संभाजी लांगोरे म्हणाले, काम करताना अनेक चांगले, वाईट अनुभव नक्कीच आले. मी कायम प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यावर भर दिला. यात सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांची साथ मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: कोकणात उकाडा वाढला; विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला

Tanta Mukti Committee: गावागावांतील ‘तंटामुक्ती’ कागदावरच

Biometric Attendance: ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक अनिवार्य

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT