Agrowon Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition : छत्रपती संभाजीनगरला ‘अॅग्रोवन’चे ११ जानेवारीपासून भव्य कृषी प्रदर्शन

Agriculture Exhibition In Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २४’ प्रदर्शन यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखात होत आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २४’ प्रदर्शन यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखात होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लोकप्रिय ठरणारे ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. त्यामुळेच ‘आधुनिक शेतीच्या प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणजे ‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन,’ असा लौकिक या उपक्रमाने मिळवला आहे.

यंदा मराठवाड्यासह राज्याच्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू व बागायती शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने होतो आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरणार आहे.

‘अॅग्रोवन’कडून यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनामुळे हजारो शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रप्रणाली, सोपे प्रयोग, नवी साधने याची माहिती मिळते आहे. त्यातून शेतीमधील समस्यांशी लढण्याचे बळ मिळत गेले आहे. गेल्या वर्षी लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली होती.

कृषी क्षेत्रातील नवतंत्र प्रात्यक्षिकांसह समजावून घेण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होतो. विशेष म्हणजे ‘अॅग्रोवन’च्या प्रत्येक प्रदर्शनानंतर शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदाच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न ‘अॅग्रोवन’चा आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्वतंत्र स्टॉल्स यंदा बघण्यास मिळतील. या प्रदर्शनामुळे खासगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांची उत्पादने, नवतंत्रांची ओळख शेतकऱ्यांना होईलच; पण कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक व अभ्यासकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मिळणार आहे.

शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन उद्योगातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

स्टॉल बुकिंगसाठी...

राज्यातील हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनात स्टॉल बुकिंगकरिता इच्छुकांना दत्ता ८६२४०२३२५६ व अभय ९१४५७११७७७ यांच्याशी संपर्क साधता येईल. आनंदाची बाब म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना सवलतीच्या दरात स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT