Agrowon Exhibition : सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान

शेतकरी दालनांच्या माध्यमातून पिकांतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेत असल्याचे चित्र प्रदर्शनातील चारही दिवस पाहण्यास मिळाले. त्यामुळे हे दालन प्रदर्शनातील वैशिष्टपूर्ण ठरले.
Agrowon Agricultural Exhibition 2023
Agrowon Agricultural Exhibition 2023Agrowon

राज्यातील कापूस, (Cotton) सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांना काळानुरूप बदलणाऱ्या सुसंगत तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) माहिती आणि अनुभूती औरंगाबाद येथे भरलेल्या यंदाच्या ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनातून मिळाली. (Agrowon Agricultural Exhibition 2023)

अनेक शेतकरी दालनांच्या माध्यमातून पिकांतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेत असल्याचे चित्र प्रदर्शनातील चारही दिवस पाहण्यास मिळाले. त्यामुळे हे दालन प्रदर्शनातील वैशिष्टपूर्ण ठरले.

वातावरण बदलामुळे (Climate Change) खरिपातील प्रमुख पिकांचे अर्थकारण बदलले आहे. उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत आहे. दुसरीकडे उत्पादनावर परिणामही जाणवत आहे.

हे लक्षात घेता कंपन्यांच्या दालनांमध्ये कापूस, सोयाबीन उत्पादकांचा खर्च कमी करण्याऱ्या विविध उत्पादनांची वा घटकांची मांडणी करण्यात आली होती. सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा त्यात प्रामुख्याने मोठा वाटा राहिला.

या निविष्ठांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच रासायनिक खतांसाठी करावा लागणारा खर्च कमी होऊ शकतो हे दालनामधून पटवून दिले जात होते. बाजारात नव्याने दाखल झालेल्या वाणांची माहितीही कापूस उत्पादकांसाठी उपलब्ध होती.

Agrowon Agricultural Exhibition 2023
Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon

टोकण यंत्रांकडे शेतकऱ्यांचा कल

कापूस, सोयाबीन लागवडीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सध्या सुधारित टोकण यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, ही वाढती गरज पाहून यांत्रिकीकरणाच्या दालनांमध्ये अशा प्रकारच्या अवजारांची मांडणी करण्यात आली होती.

मानवचलित तसेच यंत्रचलित अशा यंत्रांमुळे मजुरांवरील खर्च कमी करता येतो हे शेतकरी समजून घेत होते. शेतकऱ्यांचा या दालनांमध्ये पहिल्या दिवसांपासूनच अधिक प्रमाणात ओढा दिसून आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com