Wardha News : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत मोर्शी येथील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डावा कालव्यावरून १८ हजार ३०० मीटरवरून आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील पाच हजार एकरांवर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
आष्टीतील १४९ हेक्टर, किन्हीतील ७९.८० हेक्टर, वाडीतील ३०२.९० हेक्टर, नागझरीतील ५३.१० हेक्टर, चामला २७१.१४ हेक्टर, थारमध्ये २७२.८२ हेक्टर, बांबर्डातील २९०.४० हेक्टर, बोरखेडीतील २१०.६९ हेक्टर, बोटोणातील १२३.१० हेक्टर, कारोलातील १०२.८८ हेक्टर, वाघोडातील १७३.६० हेक्टर आदी गावांतील २०३० हेक्टर म्हणजे पाच हजार ७५ एकर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे वर्षानुवर्षे कायमच दुष्काळी भागात आता लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. त्यामुळे या परिसरात नंदनवनच फुलणार आहे, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुमीत वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.
अशी आहे आष्टी उपसा सिंचन योजना
‘आष्टी उपसा सिंचन योजने’चे वैशिष्ट्य म्हणजे पाइपद्वारे या क्षेत्रात दोन टप्प्यात पाणी पोहोचवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा प्रकल्पाच्या एलबीसीमधून त्याच्या आरडी १८ हजार ३०० मीटरमधून होईल. पहिल्या टप्प्याचे पंप हाऊस सुमारे दो हजार ५१० मीटर आहे.
पाण्याच्या समतोल भागापासून गुरुत्वाकर्षण प्रकार पाइप वितरणाद्वारे जवळच्या कमांड एरियासाठी चेंबरचा वापर केला जाणार आहे. पाण्याचा काही भाग दुसऱ्या टप्प्यात पंपिंगद्वारे आणि इच्छेनुसार उचलला जाईल. त्या लिफ्टिंग पॉइंटपासून सुमारे सात हजार ६६५ मीटर अंतरावर असलेल्या डिलिव्हरी चेंबरमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.