Irrigation
IrrigationAgrowon

Agriculture Irrigation Scheme : ‘आष्टी उपसा’चे पाणी मोडनिंबच्या शिवारात

Aashti Upsa Irrigation Scheme : तब्ब्ल २८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मोडनिंब शिवारात पोचले.
Published on

Solapur News : तब्ब्ल २८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मोडनिंब शिवारात पोचले. १९९५ मध्ये सेना- भाजप शासनाच्या कार्यकाळात ही योजना मंजूर करण्यात आली होती. मोडनिंब येथे पोचलेल्या पाण्याचे पूजन आष्टी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी भाजपचे रविकांत जाधव, शिवसेनेचे दीपक सुर्वे, राष्ट्रवादीचे संतोष पाटील, महादेव सुर्वे, शशिकांत सुर्वे, महेश व्यवहारे, धनाजी सुर्वे, सतीश पाटील, विलास सुर्वे, गणेश सुर्वे, प्रकाश मुळीक, सिद्धेश्वर काळे, मनोज सुर्वे, विठ्ठल ओहोळ आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Irrigation
Kukdi Irrigation : दहा दिवस आधीच सुटले कुकडीचे आवर्तन

योजनेतील उजव्या वितरिकेचे काम पूर्ण झाले असून, डाव्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना मात्र बराच काळ संघर्ष करावा लागत आहे. अनेक वर्षे रखडलेल्या रेल्वे खालील बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. गेल्या नऊ वर्षांपासून आष्टी उपसा सिंचन योजना संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनेही केली.

या संघर्ष समितीमध्ये मोडनिंब, आष्टी, गिड्डेवाडी, बैरागवाडी येथील शेतकऱ्यांनी लढा दिला. या जनरेट्याची दखल राजकीय व प्रशासकीय पातळीवर घेतली गेल्याचे समाधान मोडनिंब व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Irrigation
Irrigation Department : पाणी मागणी अर्ज ३० डिसेंबरपर्यंत सादर करावेत

मोडनिंब येथे पाणी पोचले असले तरी, डाव्या वितरिकेचा निम्मा टप्पाच पूर्ण झाला आहे. १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून अजूनही जवळपास जवळपास १४ किलोमीटरचे काम होणे बाकी आहे. मोडनिंब येथील दोन पूल व बैरागवाडी, गिड्डेवाडी, आष्टी येथील अर्धवट कामे पूर्ण झाल्याशिवाय पुढील गावांना पाणी पोचणे अशक्य आहे.

योजना मंजूर झाल्यापासून १४ किलोमीटर पाणी येण्यास शेतकऱ्यांच्या एका पिढीस संघर्ष करावा लागला. निदान उरलेले १४ किलोमीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा सूर सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com