Maharashtra Assembly  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : शेतकरी चळवळीमुळे शेतकरीपुत्राची विधानसभेला कडवी झुंज

Chandwad Assembly Election : चांदवड-देवळा मतदार संघात शेतकरी चळवळीमुळे शेतकरीपुत्राने विधानसभेला प्रस्थापितांना कडवी झुंज दिली. त्यामुळेच पराभूत होऊनही ‘प्रहार’चे गणेश निंबाळकर चर्चेत आले आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात आघाडीवर असून शेतकरी चळवळीमुळे जिल्ह्याची देशभरात वेगळी ओळख आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी चळवळीची ताकद दिसून आली नाही.

मात्र अपवाद चांदवड-देवळा मतदार संघात शेतकरी चळवळीमुळे शेतकरीपुत्राने विधानसभेला प्रस्थापितांना कडवी झुंज दिली. त्यामुळेच पराभूत होऊनही ‘प्रहार’चे गणेश निंबाळकर चर्चेत आले आहेत. चांदवड तालुक्यातील दहीवद येथील गणेश रमेश निंबाळकर यांनी विधानसभेचे मैदान गाजवले.

चांदवड-देवळा मतदार संघातील निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. एकीकडे चांदवड व देवळा असा भौगोलिक अस्मितेचा मुद्दा काहीअंशी होताच. त्यामध्ये भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची त्यांचे चुलतभाऊ केदा आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल यांची सरळ लढत होती. मात्र कुठलीही राजकिय पार्श्‍वभूमी नाही, सक्षम प्रचार यंत्रणा नाही, फक्त शेतकऱ्यांच्या बरोबरीने निंबाळकर यांनी उमेदवारी करून दुसऱ्यास्थानी येत लढत दिली.

गेल्या १० वर्षांपासून ते शेतकरी चळवळीत आहेत. शेती प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका घेत त्यांनी सातत्याने आवाज उठवला. २०१६ मध्ये चांदवड बाजार समितीच्या आवारात कांद्याला अवघा प्रतिक्विंटल ५० रुपये दर पुकारल्याने त्यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यांच्या या भूमिकेची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर किसान क्रांती मोर्चा व नंतर प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेली पाच ते सहा मोठ्या आंदोलनांमुळे ते राज्यभरात चर्चेत आले.

कांदा निर्यात बंदी उठवण्यासह, नाफेड कांदा खरेदी भ्रष्टाचार मुद्द्यावर त्यांनी रान उठवले. नाशिक शहरात शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मोटरसायकलवर येऊन नाशिकच्या मध्यवर्ती भागात तीन तास केलेले आंदोलन राज्यभरात चर्च ठरले होते. पुढे शेतकऱ्यांच्याच आग्रहाने त्यांनी उमेदवारी केली. एकीकडे काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल, दुसरीकडे अपक्ष असलेले नाफेडचे संचालक केदा आहेर होते.

केदा यांच्यामागे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांची चांदवड तालुक्यातून ताकद मिळाली होती. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर लढलेल्या या शेतकरी पुत्राने कडवी झुंज दिली. त्यामुळे शेतकरी चळवळ याच मतदार संघात जिवंत राहिल्याचे दिसून आले; मात्र काही ठिकाणी शेतकरी चळवळ दिशाहीन झाल्याचेही या निमित्ताने समोर आले.

अशी मिळाली मते

भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना १,०४,८२६ मते मिळाली. ते ४८,९६१ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. तर निंबाळकर यांना ५५,८६५ मते मिळाली. ताकद व नेते समवेत असताना केदा आहेर यांना ४८,७२४ मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानी तर माजी आमदार शिरीष कोतवाल यांना २३,३३५ मते मिळाल्याने चौथ्या स्थानी गेले. त्यामुळे शेतकरी चळवळ जिवंत असल्याचे निकालाने दाखवून दिले. गुलाल डॉ. आहेर यांच्या वाट्याला आला; मात्र चर्चेत निंबाळकर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’

Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार

Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम

Banana Rate: हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

SCROLL FOR NEXT