Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Vidhansabha Election Result Update : लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकलेल्या भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई महायुतीने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे.
Maharashtra Assembly Election Result
Maharashtra Assembly Election ResultAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विधानसभेच्या राजकारणाच्या सारिपाटावर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकलेल्या भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई महायुतीने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे.

अनेक मतदार संघात काट्याच्या तर काही मतदार संघात एकहाती विजय मिळवीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बीडमध्ये सहापैकी पाच, जालन्यात सर्व पाच व छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ पैकी ....या कामगिरीच्या जोरावर महाविकास आघाडीपेक्षा आपणच सरस असल्याचे दाखवून दिले आहे.

Maharashtra Assembly Election Result
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

बीडमध्ये सहापैकी पाच जागी महायुती

मराठवाड्यात अत्यंत महत्त्वाच्या बीड जिल्ह्यात सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकत त्यातही महाविकास आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी सुमारे १ लाख ४० हजारावर मतांनी विजय संपादन केला. दुसरीकडे आष्टी मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे गेलेल्या भाजपाच्या सुरेश धस यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ७५ हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला.

गेवराईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह पंडित विजयश्री खेचून आणली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बदामराव पंडित यांचा ४२ हजारावर मतांनी पराभव केला. केज मतदार संघात भाजपाच्या नमिता मुंदडा यांनी तीन हजाराच्या फरकाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्या पराभव केला.

येथे निकराची लढाई झाली. विशेष म्हणजे केज ही खासदार बजरंग सोनवणे यांची होम पीच आहे. माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश सोळंके सुमारे ६ हजार मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड मतदारसंघातील संदीप क्षिरसागर हे एकमेव महाविकास आघाडीकडून आपली आमदारकी कायम ठेवण्यात यशस्वी झाले.

Maharashtra Assembly Election Result
Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

जालन्यात कडवी झुंज तरी महायुतीच पुढे

जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा मतदार संघ शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कॉंग्रेसकडून खेचून आणत विजयश्री मिळविली. त्यांनी कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा सुमारे ३१ हजारावर मतांनी पराभव केला. परतूर विधानसभा मतदार संघात भाजपचे बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा आमदारकी कायम राखत अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे आसाराम बोराडे यांचा चार हजारावर मतांनी पराभव केला.

घनसावंगी मतदारसंघात निवडणूक घासून सुरू होती. गतवेळच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे व महायुतीमधील शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना सुरू होता. २३ फेऱ्या अखेर शिवसेनेचे श्री उढाण ५६०७ मतांनी आघाडी घेऊन होते.

आणखी दोन फेऱ्यांची मतमोजणी बाकी होती. भोकरदन मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे विजयाच्या २३ हजार १६७ मतांनी विजय मिळवला. बदनापूर मतदार संघातून महायुतीचे नारायण कुचे पुन्हा एकदा आमदारकीच्या दिशेने वाटचाल करीत होते. २१ व्या फेरीअखेर सुमारे २५ हजार मतांची विजयी आघाडी ते घेऊन होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा महायुतीचाच बालेकिल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांचा सुमारे १८०० मतावर पराभव केला.

अखेरच्या फेरीपर्यंत या मतदार संघातून कोण विजयी याची शाश्वती नव्हती. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांचा ३२ हजारावर मतांनी पराभव केला. कन्नड विधानसभा मतदार संघात संजना जाधव यांनी १८ हजारावर मतांनी विजयश्री खेचून आणली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रदीप जयस्वाल यांनी आठ हजारावर मते घेत विजय मिळविला. औरंगाबाद पूर्व मतदार संघाची लढत

अत्यंत रोमहर्षक झाली सुरुवातीपासून आघाडी घेऊन असलेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा महायुतीचे भाजपाचे अतुल सावे यांनी केवळ १७७७ मतांनी पराभव केला. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विलास संदिपान भुमरे यांनी २८ हजारावर मतांनी विजय संपादन केला. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरणारे यांनी मिळविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com