Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate Crisis : एक एकर कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर

Onion Crop Damage : वादळी पावसासह धुक्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने संतप्त झालेल्या आंबीखालसा (ता. संगमनेर) येथील संपत मारुती भुजबळ या शेतकऱ्याने एक एकर कांद्यावर थेट रोटाव्हेटर फिरवला आहे.

Team Agrowon

Sangamner News : वादळी पावसासह धुक्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने संतप्त झालेल्या आंबीखालसा (ता. संगमनेर) येथील संपत मारुती भुजबळ या शेतकऱ्याने एक एकर कांद्यावर थेट रोटाव्हेटर फिरवला आहे. त्यामुळे झालेला खर्चही अंगलट आला आहे.

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या पानसवाडी येथे संपत भुजबळ हे शेतकरी राहात आहेत. कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून त्यांनी एक महिन्यापूर्वी एक एकर क्षेत्रात गावठी कांद्याची लागवड केली होती.

सुरुवातीला कांद्याचे पीकही जोमात होते. मात्र, त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे पीक चांगलेच झोडपून काढले. त्यातच पुन्हा ढगाळ वातावरणाचा फटकाही कांद्याला बसला असून शेंडे पिवळे पडून थेट पिळकावणे पडले आहे. त्यामुळे कांदे ठेवूनही त्यात काही सुधारणा होत नव्हती म्हणून संतप्त झालेल्या भुजबळ या शेतकऱ्याने कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे.

एक एकर कांद्यासाठी झालेला खर्चही फिटला नाही. त्यामुळे भुजबळ यांच्यावर डोक्यालाच हात लावण्याची वेळ आली आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. पावसाअभावी खरीप हंगामही वाया गेला असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच आता तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे.

सुरुवातीला ढगाळ वातावरणाचे संकट होते. त्यातच पुन्हा दोन ते दिवसांपासून धुक्याचे संकट ओढावले आहे. सर्वत्र धुकेच धुके पहावयास मिळत आहे. त्यामुळे याचा फटका थेट कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो या पिकांसह डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांनाही बसला आहे. वीस दिवसांपूर्वी एक एकर क्षेत्रात गावठी कांद्याची लागवड केली होती.

त्यासाठी जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांचा खर्च आला होता. मात्र, अवकाळी पावसासह धुक्याने कांद्याला पिळकावणे पडले आहे. त्यामुळे एक एकर कांद्यावर थेट रोटाव्हेटर मारला आहे असे शेतकरी संपत भुजवळ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahadevi Elephant : ‘महादेवी’साठी नागरिकांची नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा

Sugarcane Cultivation : महाराष्ट्र, कर्नाटकात ऊस क्षेत्रात वाढ

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचे आश्‍वासन पूर्ण करणार ः मुख्यमंत्री फडणवीस

Rural Housing Scheme : स्वामी चिंचोली येथील घरकुले प्रगतीपथावर

Rainfall Shortage Maharashtra : राज्यातील सव्वादोनशे तालुक्यांत कमी पाऊस

SCROLL FOR NEXT