Onion Crop Damage : खानदेशात कांदा रोपवाटिकांचे नुकसान

Pre Monsoon Rain Update : खानदेशात मॉन्सूनोत्तर पावसाने विविध पिकांसह कांदा रोपवाटिकांचेदेखील नुकसान झाले आहे. यामुळे कांदा लागवडीसंबंधी पुढे अडचणी येतील, अशी स्थिती आहे.
Onion Damage
Onion DamageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मॉन्सूनोत्तर पावसाने विविध पिकांसह कांदा रोपवाटिकांचेदेखील नुकसान झाले आहे. यामुळे कांदा लागवडीसंबंधी पुढे अडचणी येतील, अशी स्थिती आहे.अनेक शेतकऱ्यांनी मागील १० ते १२ दिवसांत कांदा रोपवाटिका तयार केल्या आहेत. या रोपवाटिकांत बीजांकुरण झाले होते. अशातच पाऊस आल्याने अंकुरांचे नुकसान झाले आहे. रोपांची तूट तयार झाली असून, फवारणी घेऊनही उपयोग नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात उन्हाळ कांदा लागवड दरवर्षी ११ ते १२ हजार हेक्टरवर केली जाते. सर्वाधिक सहा ते सात हजार हेक्टर एवढी लागवड धुळे जिल्ह्यात असते. या लागवडीसाठी कमाल शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांत कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच रोपवाटिकांत बियांची पेरणी केली होती.

Onion Damage
Onion Cultivation : कांदा लागवड २५ टक्क्यांनी घटणार

तर अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात रोपवाटिकांत बियांची पेरणी केली. या रोपवाटिकांत शेतकऱ्यांनी पाट पद्धतीने तसेच ठिबक, तुषार सिंचन प्रणालीच्या मदतीने सिंचन केले. रोपवाटिकांत चांगला वाफसा होता. अशातच ढगाळ वातावरण होते. यामुळे बुरशीजन्य व इतर समस्या तयार झाल्या.

यासंबंधी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी घेतली. यातच नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस आला. सर्वत्र पावसाने थैमान घातले. यात काळ्या कसदार जमिनीतील कांदा रोपवाटिकांतील कोवळ्या अंकुरांची हानी झाली आहे. रोपवाटिकांत रोपांची तूट दिसू लागली आहे. तसेच तणही झपाट्याने वाढले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण ही तूट आता भरून काढणे शक्य नाही. नव्याने रोपवाटिका तयार केल्यास पुढे लागवडीला विलंब होईल.

Onion Damage
Onion Crop Damage : कांदा रोपांवर तणनाशक फवारल्याने मोठे नुकसान

यातच यंदाही कांद्याची लागवड अपेक्षित क्षेत्रात होणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कमी रोपवाटिका तयार केल्या होत्या. यंदाची लागवड १० ते ११ हजार हेक्टरवर होईल. लागवड या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे संकेत आहेत.

लागवड कमी करण्याचा पर्याय

सर्वत्र पाऊस होता. नंदुरबार जिल्ह्यात २५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. धुळे व जळगाव जिल्ह्यातही सलग तीन दिवस पाऊस झाला. काही भागांत हलकी गारपीट काही सेकंद झाली. यामुळे खानदेशातील सर्वच भागांतील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना इतरत्र रोप उपलब्ध होणार नाहीत, अशी स्थिती आहे.

यामुळे रोपांच्या उपलब्धतेनुसार नियोजन करावे लागणार असून, लागवड कमी होईल, असे दिसत आहे. तसेच रोपांचे दरही पुढे वधारतील. यामुळे महागडी रोपे घेऊन लागवड पूर्ण करून घ्यावी लागेल, असे चित्र खानदेशात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com