Social Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Social Farming: करारदार शेतकऱ्याला लाखोंची भरपाई रक्‍कम

Rural Literacy: संपत्तीसाठी भावाभावांमध्ये वादाचे प्रसंग उद्‍भवतात. मात्र गांधी आणि विनोबांच्या विचारांचा पगडा असलेले लोणी (ता.आर्णी, यवतमाळ) येथील नंदापुरे कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News: संपत्तीसाठी भावाभावांमध्ये वादाचे प्रसंग उद्‍भवतात. मात्र गांधी आणि विनोबांच्या विचारांचा पगडा असलेले लोणी (ता.आर्णी, यवतमाळ) येथील नंदापुरे कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे. या कुटुंबीयांकडून दर वर्षी त्यांची शेती करारावर दिली जाते. या शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते.

ही लाखो रुपयांची रक्‍कम स्वतःकडे न ठेवता करारदार शेतकऱ्यालाच देण्यावर त्यांनी सातत्य राखले आहे. लोणी हे जेमतेम साडेचार ते पाच हजार लोकवस्तीचे गाव. याच गावातील (कै.) तुकाराम नंदापुरे हे लोणी येथे १८९५ मध्ये गावातील शाळेत शिक्षक होते. विनोबांच्या भूदान चळवळीत त्यांनी देखील योगदान दिले.

त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा देखील होता. त्यामुळे स्वातंत्र चळवळीत देखील त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांचा मुलगा दत्तराम नंदापुरे यांनी गावात १९७५ मध्ये वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. लोकांमध्ये साक्षरता रुजावी असा उद्देश त्यामागे होता. पुढील काळात त्याला शासनाचे अनुदानही मिळण्यास सुरुवात झाली.

सध्या या ग्रंथालयात १८ ते २० हजारांवर ग्रंथसंपदा आहे. या वाचनालयात महिला, मुले आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र दालन आहे. वाचन सहलीचा उपक्रमही राबविला जातो. नुकताच ग्रामगीता सामूहिक वाचन देखील या ठिकाणी घेण्यात आला. दत्तराम यांच्या विचारांचा वारसा त्यांची दोन्ही मुले जयंत आणि अपर्णा नंदापुरे चालवीत आहेत.

सध्या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाची सूत्रे अपर्णा यांच्याकडे आहेत. जयंत हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी २००५ मध्ये २० एकर जमिनीची खरेदी केली. यातील पाच एकर जमीन त्यांना विकावी लागली. आता त्यांच्याकडे १५ एकर जमीनधारणा आहे.

शेती करारावर

मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने जयंत हे वर्धा येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन शक्‍य होत नसल्याने ते जमीन करारावर देत आहेत. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत मिळणारी नुकसान भरपाई ते स्वतःकडे न ठेवता ते करारदार शेतकऱ्याला देतात.

श्रमिकालाच त्याच्या श्रमाचा मोबदला मिळावा म्हणून करारदाराला नुकसान आणि विमा भरपाई देण्याचा निर्णय घेतला. एक लाख १० हजार रुपयांचा विमा आणि नुकसान भरपाई मिळाली होती. ही रक्‍कम नुकतीच करारदार शेतकऱ्याला दिली. या र‍कमेचा देखील संबंधित शेतकऱ्याने चांगला विनियोग करीत त्यातून दुधाळ म्हशींची खरेदी केली.
- जयंत नंदापुरे लोणी, आर्णी, यवतमाळ ८०५५००२६२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT