Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Sowing : खानदेशात ९१ टक्के पेरण्या पूर्ण

Agriculture Sowing Update : खानदेशात या आठवड्यातही पेरण्या सुरूच आहेत. आतापर्यंत खानदेशात सुमारे ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात या आठवड्यातही पेरण्या सुरूच आहेत. आतापर्यंत खानदेशात सुमारे ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदींची पेरणी पूर्ण झाली आहे. बाजरी, तूर, मका आदींची लागवड काही भागात सुरू आहे. यंदा पेरण्या जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ८० टक्क्यांवर पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांना सुरवातीपासून गती आहे.

नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सततच्या पावसाने पेरण्या रखडल्या होत्या. परंतु या आठवड्यात काहीशी उघडीप मिळाली. वाफसा हवा तसा नसतानाही अनेकांनी पेरणी उरकली आहे. खानदेशात यंदा सर्वच पिकांची पेरणी वेळेत झाली आहे.

मागील हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४० टक्केही पेरणी झालेली नव्हती. तसेच उडीद,मूग आदी पिकांची पेरणी जूनमध्ये पावसाचा खंड असल्याने मागील वेळेस कमी झाली होती. यंदा मात्र जूनमध्ये महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जळगाव, धुळे जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस जूनमध्ये झाला. नंदुरबारातही पाऊसमान चांगले राहीले आहे.

या आठवड्यातही अनेक भागात पाऊस झाला. परंतु सतत पाऊस नव्हता. काही भागात अतिजोरदार पाऊसही झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावातील मेहुणबारे, बोदवड, धरणगाव भागात अतिजोरदार पाऊस मागील दोन दिवसात झाला आहे. परंतु सर्वत्र जोरदार पाऊस नव्हता. काही भागात पावसाने उसंत दिली किंवा तुरळक पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्यांना फारशी अडचण मागील पाच ते सहा दिवसात झालेली नाही.

तूर, सोयाबीन व मका लागवड अनेकांनी मागील चार ते पाच दिवसात केली आहे. खानदेशात १४ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात सात लाख ६७ हजार हेक्टरवर, धुळ्यात चार लाख हेक्टरवर आणि नंदुरबारात पावणेतीन लाख हेक्टरवर पिकपेरा खरिपात अपेक्षित आहे. तिन्ही जिल्ह्यांत पेरणी वेगाने झाल्याने पेरणीची टक्केवारी दर आठवड्याला वाढली आहे. मागील १० दिवसात पेरणी अधिक गतीने झाली आहे.

पीकस्थिती बरी

खानदेशात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्या सुरू झाल्या होत्या. जेथे चांगला पाऊस झाला, तेथे पेरण्याही झाल्या. पावसात खंड न पडल्याने पेरण्या यशस्वी झाल्या. पाऊस येतच अससल्याने पीकस्थिती बरी आहे. मका, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिकांनी तास धरले आहे.

कापूस पीक अधिक

खानदेशात कापसाची लागवड मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे सध्या दिसत आहे. मागील हंगामात सुमारे आठ लाख ५६ हजार हेक्टरवर खानदेशात कापूस पीक होते. यंदाही साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित होती.

परंतु जळगाव जिल्ह्यात लागवडीत घट झाल्याचे दिसत आहे. अंतिम लागवड अहवाल आलेला नाही. परंतु खानदेशात अद्याप सुमारे आठ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड पाच लाख ३० हजार हेक्टरवर पोचली आहे. यात पूर्वहंगामी कापसाची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टरवर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT