Agriculture Sowing : यवतमाळ जिल्ह्यात सहा लाख हेक्टरवर पेरणी

Sowing Update : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे पेरणीला गती आली आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon

Yavatmal News : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे पेरणीला गती आली आहे. आतापर्यंत सहा लाख हेक्टरवर पेरणी झाली असून सर्वाधिक साडेतीन लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र नऊ लाख दोन हजार ७०२ हेक्टर आहे. यातील आठ लाख ९७ हजार ३९० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन केले आहे. सहा लाख ३९ हजार ६७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाअभावी पेरणी खोळंबली होती. जूनच्या शेवटच्या तारखेपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला असून पेरणीलाही वेग आला आहे. गेल्या काही दिवसांत पेरणी क्षेत्र सहा लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : धाराशिव जिल्ह्यात ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी

कापूस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हुकमी पीक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा नेहमीच जास्त राहिलेला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी कापसालाच पसंती दिली आहे. आतापर्यंत तीन लाख ५९ हजार ९७७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. बियाणे तसेच पावसाची उसंत यामुळे यंदा कापसाचा पेरा घटण्याचा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीला पुन्हा एकदा पसंती दिल्याचे दिसून येत आहे. एक लाख ९५ हजार ८३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. राळेगाव तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : पावसाच्या आशेवर कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरणीला वेग

जिल्ह्यात पावसाचे आगमन समाधानकारक झाले आहे. यामुळे पेरणीक्षेत्र वाढले आहे. खरीप हंगामात आतापर्यंत ७९ हजार ११९ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पेरा अत्यंत कमी आहे.

तालुकानिहाय कापसाचे पेराक्षेत्र (हेक्टर)

यवतमाळ २४६२०

बाभूळगाव १६१११

कळंब २१०८६

दारव्हा २८३००

दिग्रस १८७५०

आर्णी २४२२८

नेर १४७६०

पुसद ३०९७१

उमरखेड १२५६३

महागाव २२८६०

वणी ५९६७

मारेगाव ९८८४

झरीजामणी २१६२५

केळापूर ३५४२०

घाटंजी ३५८६९

राळेगाव ३६९०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com