Maize Fodder Cultivation : अशी करा सकस, रुचकर चाऱ्यासाठी मका लागवड ?

Maize Fodder : जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून मक्याचा चारा उपयुक्त आहे. मक्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ ते ११ टक्के असत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी वर्षातून कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत.
Maize Fodder
Maize FodderAgrowon

जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून मक्याचा चारा उपयुक्त आहे. मक्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ ते ११ टक्के असत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी वर्षातून कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत. घरच्याघरी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात चारा म्हणून मका लागवडीचा तुम्ही नक्की विचार करु शकता.

जनावरांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकून राहण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे. हा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावराच्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते. त्यांच्या शरिराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. आहारात जास्त प्रमाणात खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असं प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावराच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. दर्जेदार हिरव्या चारा अभावी  कमजोर वासरे जन्मतात. त्यामुळे जनावरांना दररोज हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी लवकर वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून मका पीक उपयुक्त आहे. मका चाऱ्याचा उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो. 

Maize Fodder
Millet Cultivation : सकस चाऱ्यासाठी बाजरी, चवळी लागवड

मका लागवडीसाठी जमीन सुपीक, कसदार आणि निचरायुक्त निवडावी. एक नांगरट आणि  कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी जातींची निवड करताना आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी. पाऊस झाल्यानंतर वाफसा आल्यानंतर जून-जुलै महिन्यात पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो

स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्यावेळी आणि उर्वरित ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.

जमीन - सुपीक, कसदार आणि निचरायुक्त 

मशागत - एक नांगरट आणि  कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या 

लागवडीसाठी  जाती- आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय 

बियाणे प्रमाण - हेक्टरी ७५ किलो  

बिजप्रक्रिया - २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर प्रती १० किलो बियाणे

पेरणीचा कालावधी - जुन- जुलै

खतव्यवस्थापन - १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश

पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात म्हणजे पेरणीनंतर सधारणपने ६५ ते ७० दिवसांनी कापणी करावी. मका पिकासापासून हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते. 

नेक शेतकरी मक्‍याची कणसे पक्व झाल्यानंतर मक्‍याचा चारा जनावरांना घालतात. त्याऐवजी ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना जनावरांना चारा द्यावा. कारण या वेळी मक्यातील सकसतेचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय खरीप हंगामात लागवड केलेल्या मक्‍यापासून मुरघास तयार करून ठेवावा. त्याचा उपयोग इतर हंगामात म्हणजेच उन्हाळ्यातदेखील करता येतो.

माहिती आणि संशोधन - डॉ. संदीप लांडगे, डॉ. शिवाजी दमामे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com