Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Loan : कारखान्यांना साखर किमतीच्या ९० टक्के कर्ज देणार

Sugar Production : यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार याचा विचार करून साखर कारखान्यांना गेल्या वर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या ९० टक्के कर्ज देण्यात येईल.

Team Agrowon

Sangli News : यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार याचा विचार करून साखर कारखान्यांना गेल्या वर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या ९० टक्के कर्ज देण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेतल्याची माहिती बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या यांनी दिली.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्जपुरवठा करण्यात येतो. २०२३ गाळप हंगामासाठी मंजूर करावयाचे खेळत्या भांडवली कर्जाबाबतच्या धोरणावर चर्चा झाली. याबाबत अध्यक्ष नाईक म्हणाले, की यावर्षी ऊस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असून कारखानेही कमी कालावधीसाठी सुरू राहतील.

त्यामुळे सध्या तरी गेल्या वर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या ९० टक्के कर्जपुरवठा करण्याचे ठरले आहे. याबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची लवकरच बैठक घेऊन याबाबत अंतिम धोरण ठरवण्यात येणार आहे.

बँकेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्याचे टेंडर मंगळवारी (ता. १७) उघडण्यात आले. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय झाला नाही. जिल्हा बँकेमार्फत इलेक्ट्रिक वाहनासाठी कर्जपुरवठा आतापर्यंत करण्यात येत नव्हता. आता या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नऊ टक्के दराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठ्यावर चर्चा

बैठकीत साखर कारखान्यांना डिस्टिलरी प्रकल्पाकरता कच्चामाल व उत्पादित पक्क्या मालाच्या साठ्यावर कर्जपुरवठ्याचे धोरण ठरवणे, खेळती भांडवली साखर तारण व नजर गहाण कर्ज मर्यादा डिसेंबर २३ अखेर मुदत वाढवून देण्याबाबत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा योजनेअंतर्गत निर्णय घेणे याबाबत चर्चा झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT