Chhatrapati Sambhajinagar News : जवळपास तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे एकूण २७ पैकी १८ गेट आतापर्यंत उघडण्यात आले आहेत.
या गेटमधून होणारा पाण्याचा विसर्गही ९४३२ क्युसेक करण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याशिवाय उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पासाठीही पाणी सोडले जात आहे.
जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १०) सकाळी सहाच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा ७५.३९ टीएमसी, तर एकूण पाणीसाठा १०१.४६ टीएमसीवर पोहोचला होता.
जो प्रकल्प क्षमतेच्या ९८.३५ टक्के होता. सकाळी सहाच्या सुमारास प्रकल्पात १२,७४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर सांडव्याने ६ हजार २८८ क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात होते.
तसेच उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने माजलगाव प्रकल्पासाठी पाणी सोडले जात होते. सोमवारी (ता. ९) दुपारी १२ ते १ च्या दरम्यान एकूण ६ दरवाजे ०.५ फूट उंचीने उघडून ३१४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.