Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Stock : यंदाच्या खरीप हंगामासाठी ८८ हजार ७०० टन खतसाठा मंजूर

Kharif Season : आगामी खरीप हंगामासाठी ९१ हजार ६८७ टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून कृषीआयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यापैकी ८८ हजार ७०० टन खतांचे वाटप मंजूर करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामासाठी ९१ हजार ६८७ टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून कृषीआयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यापैकी ८८ हजार ७०० टन खतांचे वाटप मंजूर करण्यात आले आहे. चार हजार टन अधिक खतसाठा मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सध्या रब्बी हंगामातील पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काळात खरीप हंगामातील कामांना सुरुवात होईल. कापूस व सोयाबीनची दर वर्षी प्रमाणे यंदाही जास्त लागवड अपेक्षित आहे. ऐन हंगामात खतांची टंचाई नको म्हणून खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते.

अवघ्या दोन महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपला असून काही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीसुद्धा करतात. यासाठी कृषी विभागाकडून खतांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. गतवर्षी ८५ हजार ४३० मेट्रीक टन खतांचे वाटप मंजूर झाले होते. मात्र खरिपाच्या सुरुवातीलाच युरिया व डीएपीचा तुटवडा आला होता. त्यामुळे यंदा गतवर्षी पेक्षा जास्त खतांची मागणी मंजूर झाल्याने वेळेवर टंचाई रोखण्याचे आव्हान कृषी विभागाकडे आहे.

मागील वर्षात खतांच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे यंदा दरवाढ होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितल्या जात आहे. दुसरीकडे खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके नेमण्यात येतील. गत वर्षी पेक्षा यंदा पेरणीचे क्षेत्र अधिक प्रस्तावित आहे. त्यामुळे खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मंजूर खतसाठा

खत साठा ( टनामध्ये)

युरिया १८७००

डीएपी १५५००

एमओपी १८००

मिश्र खते ३२४००

एसएसपी २०३००

एकूण ८८७००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT