Fertilizer Stock : हिंगोली जिल्ह्यासाठी ७७ हजार ६१० टन खतसाठा मंजूर

Kharif Season Management : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्याला कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या ७७ हजार ६१० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे.
 Fertilizer
FertilizerAgrowon

Hingoli Fertilizer News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्याला कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या ७७ हजार ६१० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. एप्रिल महिन्यात ६ हजार ८६८ टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. विविध ग्रेडच्या ३७ हजार ७८ टन खतांचा साठा शिल्लक होता अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.

 Fertilizer
Fertilizer, Seed Supply : बियाणे, खत उपलब्धतेसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ४ लाख २४ हजार ५८९ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्याचा सरासरी खतांचा वापर ८१ हजार ५६९ टन आहे.

त्यानुसार ९५ हजार ७२९ टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. परंतु यंदाच्या खरिपासाठी हिंगोली जिल्ह्याला विविध ग्रेडच्या ७७ हजार ६१० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

त्यात युरिया १६ हजार १५१ टन, डीएपी १२ हजार ९३९ टन, पोटॅश ४ हजार ३०० टन, सुपर फॉस्फेट १५ हजार ४५१ टन, अमोनियम सल्फेट ५० टन, संयुक्त खते (एनपीके) ३ हजार ७३४ टन यांचा समावेश आहे. मार्च अखेर ३२ हजार ६८२ टन खतांचा साठा शिल्लक होता.

एप्रिलमध्ये प्राप्त ६ हजार ८५८ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण ३९ हजार ५५० टन उपलब्ध होती .त्यापैकी २ हजार २६० टन खतांची विक्री होऊन ३७ हजार ७८ टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक होता, असे कानवडे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com