Animal Husbandry Department
Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Department of Animal Husbandry : सिंधुदुर्गात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Team Agrowon

Sindhudurg News : राज्य शासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण मंजूर असलेल्या २११ पैकी तब्बल ८७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात राज्य पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहेत. या दोन्ही विभागांमध्ये जिल्हा सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि इतर अशी एकूण २११ पदे मंजूर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून यापैकी अनेक पदे रिक्त असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

सद्यःस्थितीत दोनही विभागांतील तब्बल ८७ पदे रिक्त आहेत. त्याचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या पशुपालनावर होताना दिसत आहे. लम्पी स्कीन हा त्वचाआजार आटोक्यात आणताना असलेल्या अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण आला होता.

जिल्ह्यात गायई, म्हशी, शेळ्या, डुकरे मिळून १ लाख ८८ हजार ९९ पशुधन आहे. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी असलेल्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे मोठ्या समस्येला पशुपालकांना सामोरे जावे लागत आहे.

पशुविकास अधिकारी नसल्याने पशुधनावर वेळेत उपचार होत नाहीत. याशिवाय विविध योजनांचा लाभ घेताना देखील अडचणी निर्माण होतात.
अर्जुन पोपकर, शेतकरी, सावंतवाडी
पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या पदांची भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
ज्योती खरे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन विभाग, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget 2024 News : निवडणुकांपूर्वी घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भोपळा

Khandesh Water Shortage : खानदेशातील अनेक प्रकल्प कोरडेच

Agrowon Podcast : हरभरा भाव टिकून; कापूस, सोयाबीन, हरभरा, तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Agriculture University Recruitment : कृषी विद्यापीठांमध्ये तातडीने पदभरती करावी

Kharif Season : पावसाअभावी हंगामाच्या सुरुवातीलाच चिंता

SCROLL FOR NEXT