Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागात एकूण तब्बल ३३८ पदे रिक्त असून, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम करणाऱ्या कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त आहेत.
Agriculture Officer
Agriculture Officeragrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्याचा विकास ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या कृषी खात्याचे वर्ग एकचे तिन्ही अधिकारी प्रभारी आहेत आणि पाच तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारीसुद्धा प्रभारी असल्यामुळे जिल्ह्यासह पाच तालुक्यांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. जिल्ह्यात कृषी विभागात एकूण तब्बल ३३८ पदे रिक्त असून, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम करणाऱ्या कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त आहेत.

यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून, गावांची संख्या व रिक्त पदानुसार सुमारे ५०० गावांत कृषी सहायक नसल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात चार लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, सहा लाख ७५ हजार इतके शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषी विभागात ८१७ पदे मंजूर असताना कोविडपासून गेली तीन वर्षे ४७९ कर्मचाऱ्यांवर कृषी खात्याचा कारभार सुरू आहे. या विभागात गेल्या वर्षी ३०८ पदे रिक्त होती, यामध्ये पदे भरण्याऐवजी पुन्हा तीस पदे रिक्त झाली. अशी एकूण ३३८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त असल्यामुळे शेतीच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. कमी संख्येच्या कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येत नाही, तसेच कार्यालयीन कामकाज राबवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले, यानंतर दत्तात्रय दिवेकर यांनी फक्त पाच महिन्यांसाठी या पदाचा कार्यभार सांभाळला. यानंतर आता पुन्हा हे पद प्रभारी असून, या ठिकाणी अरुण भिंगारदेवे हे प्रभारी कृषी अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. कृषी अधीक्षक, कृषी उपसंचालक, उपविभागीय अधिकारी ही प्रमुख तिन्ही पदे रिक्त असून, प्रभारींवर कामकाज सुरू आहे. आजरा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, कागल या प्रमुख तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून, प्रभारींवर कामकाज सुरू आहे.

Agriculture Officer
Kolhapur Farmers : मका, ऊस पिकाचे गव्यांकडून मोठे नुकसान, शेतकरी हैराण

येत्या दोन वर्षांत कृषी खात्यात सुमारे ९० पदे रिक्त होतील, असे चित्र आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, कीड-रोग नियंत्रण, पूरपरिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, शेतकरी मंडळ स्थापन करणे अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी खात्याकडे कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र, रिक्त पदांमुळे शेतीच्या विकासावर परिणाम होत आहे.

आजही खतांना लिंकिंग देऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात खते मारली जात आहेत, यावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. तीन ते पाच गावांसाठी एक कृषी सहायक असून, पीक सल्ला घेणे किंवा खते बी-बियाणे याबाबत सल्ला घेणे, याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येत असून, शासनाने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे.

जूनमध्ये अधीक्षक यांच्या बदल्या होतील. वर्ग एक व दोनचा विषय न्यायप्रविष्ट आहे. काही पदांची परीक्षा झाली आहे. आचारसंहितेनंतर नियुक्तीची कार्यवाही होईल. असे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com