Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : देशातील ८५ टक्के जिल्हे ‘रेडझोन’मध्ये

Weather Hit Redzone : देशातील ८५ टक्क्यांपेक्षाही अधिक जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका सहन करावा लागणार असल्याचे नव्या संशोधनातून उघड झाले आहे.

Team Agrowon

New Delhi : वैश्विक तापमानवाढीमुळे वातावरणाचा समतोल ढळला असून महापूर, दुष्काळ आणि वादळे यासारख्या नैसर्गिक संकटांची तीव्रता देखील वाढत चालली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षाही अधिक जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका सहन करावा लागणार असल्याचे नव्या संशोधनातून उघड झाले आहे.

‘आयपीई ग्लोबल’ आणि ‘ईएसआरआय इंडिया’ने याबाबत संशोधन केले होते. देशातील ४५ टक्के जिल्ह्यांमध्ये वेगळी उलथापालथ होऊ शकते. ज्या भागांना महापुराचा धोका असतो ते भाग दुष्काळी प्रदेश बनू शकतात, असेही दिसून आले आहे.

या संशोधनासाठी साधारणपणे १९७३ ते २०२३ या कालखंडातील (५० वर्षे) बदलत्या वैश्विक तापमानाचा आढावा घेण्यात आला होता. मागील दशकभराच्या अवधीमध्ये वातावरणातील तीव्र बदलांच्या घटनांमध्ये पाचपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.

महापुराच्या घटना चारपटींनी वाढल्या आहेत. देशाच्या पूर्व भागाला महापुराचा मोठा धोका निर्माण झाला असून त्यानंतर ईशान्य आणि दक्षिण भारतालाही त्याचा मोठा फटका बसू शकतो. दुष्काळाचे प्रमाण हे दुपटीने वाढले असून कृषी संकट अधिक तीव्र झाले आहे.

वादळाच्या घटनांमध्ये चारपटींनी वाढ झाल्याचे दिसून येते. या तीव्र बदलाचा मोठा फटका सकल राष्ट्रीय उत्पादनाला (जीडीपी) बसला असून २०२२ मध्ये ‘जीडीपी’मध्ये आठ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसते असे संशोधकांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT