Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : आठ लघू तलाव कोरडे; तर दहा तलावांतील साठा जोत्याखाली

Water Crisis : परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघू तलाव कोरडे पडले असून १० तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

Team Agrowon

Parbhani News : जायकवाडी पाटबंधारे विभागातील गुरुवारी (ता. ११) पर्यंतच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघू तलाव कोरडे पडले असून १० तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

दोन पैकी मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात केवळ ३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता.उन्हाचा चटका वाढला. वेगाने बाष्पीभवन होत आहे. परिणामी जिल्ह्यातील लघू प्रकल्प आटले असून अनेकांनी तळ गाठला आहे.

अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी (ता. ११) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव हे ८ लघू तलाव कोरडे पडले आहेत.

पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड), टाकळगाव (ता. गंगाखेड), भोसी (ता. जिंतूर), आडगाव (ता. जिंतूर), कवड (ता. जिंतूर), मांडवी (ता. जिंतूर), पाडळी (ता. जिंतूर) या १० लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. झरी (ता. पाथरी) तलावांमध्ये ७० टक्के, तांदुळवाडी (ता. पालम) तलावात २५ टक्के,

राणीसावरगाव (ता. गंगाखेड) तलावात २३ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात ७ टक्के मिळून ४ लघू तलावांमध्ये सरासरी २.५५५ दलघमी म्हणजेच ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. २०२३ च्या ११ एप्रिल रोजी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ८.९४३ दलघमी (२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

गुरुवारी (ता. ११)जिल्ह्यातील निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात १.०७३ दलघमी (४ टक्के ) पाणीसाठा शिल्लक होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. २०२३ च्या ४ एप्रिल रोजी करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये ८.६२६ दलघमी (३५ टक्के) व मासोळी मध्यमप्रकल्पांमध्ये ११.६३९ दलघमी (४३टक्के) तर दोन प्रकल्पांमध्ये सरासरी २०.२६५ दलघमी (३८.९४ टक्के) उपयुक्त पाणासाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

All Party Meeting Demands: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; सर्वपक्षीय बैठक बोलवा : विजय वडेट्टीवार

Legislative Council Election Result: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी

SCROLL FOR NEXT