Benefit of Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपिकांसाठी ७८६ कोटी रुपयांची विमा भरपाई

Crop Insurance Compensation : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत आंबिया बहरातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत आंबिया बहरातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यात आले आहे. भरपाईची अंदाजे ७८६ कोटींची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रयत्न विमा कंपन्यांकडून चालू आहेत.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाने राज्य हिस्सा म्हणून १९६ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. आंबिया बहार २०२२-२३ मधील फळपीक विमा योजनेत २ लाख १९ हजार १५५ शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. विमा कंपन्यांनी या योजनेत ८७७ कोटी एकूण रुपये विमा हप्ता गोळा केले. त्यातून आता १ लाख ६५ हजार ५७३ शेतकऱ्यांना ७८६ कोटींची विमा भरपाई दिली जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी), एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी या तीन कंपन्यांना विमा हप्ता रक्कम आधी द्यावी लागते. त्यानुसार ३०६ कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता मंजूर केला होता.

त्यातून एआयसीला १५१ कोटी रुपये, एचडीएफसी अर्गो ६० कोटी; तर रिलायन्स कंपनीला ९६ कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता मिळेल. राज्य शासनाने या कंपन्यांना १०९ कोटी रुपये यापूर्वीच दिले आहे. आता पुन्हा १९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना फळपिक विम्याची भरपाई मिळण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही बोगस प्रस्ताव रद्द

मृग व आंबिया अशा दोन बहारांसाठी फळपीक विमा योजना लागू केली जाते. त्यामुळे अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळण्याची सुविधा आहे.

आंबिया बहारातील विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी उत्पादक सहभागी झाले आहेत. अंदाजे अडीच लाख फळबागाईतदारांनी योजनेत अर्ज भरले होते. परंतु, काही बोगस प्रस्ताव रद्द करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT