District Development Plan Agrowon
ॲग्रो विशेष

District Development Plan : जिल्हा नियोजन समिती बैठकीत ७७३ कोटींच्या नियतव्ययास मंजुरी

Development Planning Committee Meeting : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२४-२५ साठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२४-२५ साठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (ता. ३) नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार होते.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार प्रशांत बंब तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला आधीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. त्यानंतर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नियतव्यय सादर करण्यात आला. त्यात सर्वसाधारण योजनांसाठी ६६० कोटी रुपये, विशेष घटक योजनांसाठी १०४ कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी ९ कोटी ९० लाख रुपये अशा एकूण ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या नियतव्ययास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री सत्तार म्हणाले, की सर्व यंत्रणांनी सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत. तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल

नियोजन समितीच्या झालेल्या चर्चेत खासदार कल्याण काळे, उपस्थित आमदार, सदस्य यांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी नियोजन आराखड्याचे सादरीकरण केले. महिला व बालविकास विभागामार्फत गर्भलिंगनिदान विरोधात जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझी मुलगी या कवितेचे जनजागृती पोस्टर विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असेल. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी १५ दिवसांत पावले उचलावीत.
अब्दुल सत्तार, पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री
कन्नड घाटाच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा करण्यात आली व सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सर्वांनी पाठ करावा करण्याचे ठरले विरोधासाठी विरोध नव्हे तर विकासासाठी आम्ही आग्रही आहोत. आचारसंहितेपूर्वी कामाच्या आढाव्या संदर्भात पुन्हा बैठक करत घेण्याचे सुचविले आहे. विकास कामे सुचविली त्यावर निर्णय न झाल्यास मग प्रश्न उपस्थित करू.
कल्याण काळे, खासदार जालना, संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून

Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी

Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला

Flood Relief: मदतीबाबत ‘काथ्याकूट’

Farmer Death: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ

SCROLL FOR NEXT