District Planning Meeting : ‘जिल्हा नियोजन समितीचा पालकमंत्री तीन ऑगस्टला घेणार आढावा

Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे येत्या ३ ऑगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेणार आहेत.
Chandrakant Patil
Chandrakant PatilAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्हा नियोजन समितीचा आराखडा ७०२ कोटी रुपयांचा आहे, पण आतापर्यंत केवळ पाच टक्केच निधी खर्च झाला आहे. शासनाच्या मंजुरीनंतरही निधी खर्चाची टक्केवारी खूपच कमी असल्याची स्थिती आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे येत्या ३ ऑगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेणार आहेत.

Chandrakant Patil
District Annual Plan : प्राधान्य क्षेत्रासाठी १२ हजार कोटी, इतर क्षेत्रासाठी १० हजार ६६० कोटी

जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, कृषी, समाजकल्याण, बांधकाम, महावितरण अशा महत्त्वपूर्ण विभागांकडून जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी येत असते. त्यानंतर संबंधित कामांसाठी निधी दिला जातो. पण आराखडयानुसार निधीची तरतूद करुनही कमी खर्च झाला आहे,

Chandrakant Patil
Rain in Maharashtra : जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर हलका, मध्यम पाऊस

यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा होईल, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर १० जूनपासून जिल्हा नियोजन समितीकडील किमान २५ टक्के तरी निधी खर्च होणे अपेक्षित होता. पण, जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ७०२ कोटींच्या आराखड्यातील केवळ पाच टक्केच निधी मागील दीड महिन्यात खर्च झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्याची कारणमीमांसा या बैठकीत होणार आहे, असे सांगण्यात आले.

बैठकीत ठोस निर्णय

आषाढी वारीसाठी पंढरपुरात येऊन गेलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी एक-दीड महिन्यानंतर पुन्हा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. १९ जूननंतर आता ३ ऑगस्ट रोजी पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक बैठक होवू शकते. पण त्याबाबत अद्याप काही निश्चित झालेले नाही. पण या बैठकीत निधीखर्चाबाबत ठोस अशा निर्णयाची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com