Land Slides Update Agrowon
ॲग्रो विशेष

Land Slides Update : महाडमधील ७२ गावांना दरडींचा धोका

Team Agrowon

Mahad News : महाड महसूल विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात तालुक्यातील ७२ गावांचा संभाव्य दरडग्रस्त तर ४८ गावांचा अतिधोकादायक गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या गावांमध्ये खबरदारीचा उपाय योजना करण्यासाठी महसूल विभाग सज्ज झाले आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये एनडीआरएफचे पथकही महाड येथे मुक्कामी असेल.

महाड तालुका हा दरडग्रस्त व पूरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीचा सामना महाडकारांना करावा लागतो. तालुक्यात पारमाची या गावात १९९४ मध्ये दरड कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर दरडी कोसळण्याचे सत्र तालुक्यात सुरूच राहिले. २००५ मध्ये तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो घरे बेघर झाली होती.

२०२१ मध्ये तळिये गावावर दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारीही केंबुर्ली गावाजवळ महामार्गार दरड कोसळली. मोठे दगड रस्‍त्‍यालगत पडल्‍याने दुर्घटना टळली. तर महामार्गावर आलेला मुरूम त्‍वरीत साफ करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

पावसाळा सुरू होताच महाड महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन सुरू केले असून धोकादायक गावांची यादी तयार केली आहे. यामध्ये ७२ गावे धोकादायक असून ४८ गावांना अधिक धोका आहे. अशा धोकादायक गावांची महसूल विभागाकडून पाहणी केली आहे. प्रत्येक विभागात क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करून गावांची वारंवार पाहणी केली आहे.

पाऊस वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी ग्रामस्थांना नोटिसाही बजावल्‍या आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर ग्रामस्थ ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील, अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना महसूल विभागाने केल्या आहेत.

गावातील शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय व इतर सुरक्षित ठिकाणी आवश्यकता वाटल्यास स्थलांतरित केले जाणार आहेत. अनेक वर्षांपासून महाड, पोलादपूर तसेच अन्य तालुक्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्ती ओढावत असल्याने व त्‍यात जीवितहानी होत असल्याने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची आवश्‍यकता असते.

धोकादायक गावे : महाड तालुक्यातील तुडील, टोळ खु, मोरेवाडी (शिंगरकोंड), आंबिवली पातेरेवाडी, कोंडीवते, मुठवली, चांढवे खु, सव, रोहन, पुनाडे, कोथेरी जंगमवाडी, पाचाडवाडी, मुमुर्शी बौद्धवाडी, चोचींदे, गोठे बु, पारमाची, आदिस्ते, खैरे, वाळण, रेवतळे मानेची धार, मोहोत, वराठी, कुर्ले दंडवाडी, आंबेनळी

वामने, टोळबु, नवीन कोंडीवते, पिंपळकोंड, वलंग, शेलटोली, मुमुर्शी गावठाण, कुंबळे, चोचींदे कोंड, वीर, मुमुर्शी आंब्याचा कोंड, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, सांदोशी हेटकरकोंड, वीर मराठवाडी

आपत्ती व्यवस्‍थापनासाठी आढावा बैठका

दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफचे पथक दाखल होईपर्यंत वेळ वाया जातो. त्यामुळे एनडीआरएफची गरज लक्षात घेता, महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार यंदा एक जुलैपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत पथक महाड येथे कायमस्वरूपी मुक्काम असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत दोन आढावा बैठकाही झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT