Latur News : सोयाबीनच्या काढणीनंतर शेतकऱ्यांनी लागलीच जमिनीत ओल आहे, तोपर्यंत रब्बीच्या पेरण्यांसाठी धावपळ सुरू केली आहे. गेल्या वर्षी लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून तेरा लाख ६३ हजार ६९० हेक्टर रब्बीचे सरासरी पेरणी क्षेत्र गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात १७ लाखांहून अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. .गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले होते. यंदाही मुबलक पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या क्षेत्र वाढणार असून पाच जिल्ह्यांत मिळून १५ लाख नऊ हजार हेक्टवर रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यंदाही हरभराच मुख्य पीक असणार असून, आतापर्यंत पाचपैकी केवळ परभणी जिल्ह्यातच ५७० हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत..दरम्यान, मागील चार दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत असून ढगाळ वातावरणही कायम आहे. त्याचा अडथळा रब्बीच्या पेरणीसाठी मशागत करताना शेतकऱ्यांना होत आहे. पाऊस सुरू असल्याने जमिनीतील ओल कायम असून त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची मदत यंदा रब्बी हंगामावरच आहे. .Rabi Sowing: खानदेशात रब्बी पेरणी १५ टक्के पूर्ण; शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल.मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना खरिपासाठी मशागतही करता आली नाही. यामुळे सोयाबीन काढणी होताच शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. मशागतीनंतर जमिनीतील ओलीची फायदा घेण्यासाठी शेतकरी रब्बीच्या पेरण्यांसाठी लगबग करत आहेत. अतिवृष्टीचा परिणाम रब्बीवरही झाला आहे. .या स्थितीत लातूर विभागातील लातूर जिल्ह्यात तीन लाख १८ हजार ६०० हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात चार लाख १७ हजार ९०२ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात तीन लाख लाख ३२ हजार ४१६ हेक्टर, परभणी जिल्ह्यात दोन लाख लाख ७० हजार ९७९ तर हिंगोली जिल्ह्यात एक लाख ६९ हजार २२२ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. तरीही आतापर्यंत केवळ परभणी जिल्ह्यातच रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून त्यात सर्वाधिक पेरणी हरभराची आहे..Rabi Sowing: रब्बीतील पेरण्यांना महिनाभर उशीर.यामुळे यंदाही हरभराच रब्बीचे मुख्य पीक असणार आहे. सातत्याने पाऊस होत असल्याने उर्वरित चार जिल्ह्यांत पेरण्या खोळंबल्या असून पावसाचा पेरणीची तयारी करण्यात अडथळा येत आहे..सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असून शेतकरी पाऊस उघडीप देईल, तसा रब्बीच्या पेरण्यांची तयारी करताना दिसत आहेत. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे या वर्षी रब्बीच्या पेरण्यांना उशिराने सुरुवात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.