Oranges Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची ७२ कोटींतून होणार उभारणी

Orange Processing Project : राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर असलेल्या संत्र्यापैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे.

Team Agrowon

Amravati News : वारंवार घोषणा होऊनही विदर्भातील मुख्य फळपिकावरील प्रक्रिया उद्योगाची पायाभरणी आजवर झाली नाही. आता मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने तब्बल ७२ कोटी रुपयांचा प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे संकेत आहे. त्याकरिताच पहिली बैठक शुक्रवारी (ता. २४) मुंबईत पार पडली. मोर्शी तालुक्‍यात हा मल्टिलाइन प्रकल्प उभारला जाणार आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर असलेल्या संत्र्यापैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने अनेकदा संत्रा बागायतदारांना अपेक्षित दर मिळत नाही. यंदाच्या हंगामात बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्याचा फटकाही बागायतदारांना बसत दर दबावात राहिले. त्यावर प्रक्रिया उद्योगाचा उतारा ठरू शकतो.

गेल्या ३० ते ३५ वर्षात अनेकदा या भागासाठी प्रक्रिया उद्योगाची घोषणा राज्यकर्त्यांकडून करण्यात आली. कोकाकोला-जैन या संयुक्‍त भागीदारीतील प्रकल्पाचे तर खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्‌घाटन केले होते.

या प्रकल्पातील संयंत्राची चाके गेल्या अनेक वर्षात फिरलीच नाही. त्यानंतर आता नव्याने दोन प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील मोर्शी भागात प्रस्तावित प्रकल्पाच्या उभारणीला काहीशी गती मिळाली असून शुक्रवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.

७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात संत्रा, मोसंबी, आंबा अशा फळांवर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. वर्षातील २५० ते २५५ दिवस प्रकल्प चालावा याकरिता मल्टिलाइन प्रकल्प उभारणीवर यावेळी चर्चा झाली. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन असलेल्या विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यानुसार कंपनीचे संचालक रमेश जिचकार बैठकीला उपस्थित होते. कृषी सचिव अनुपकुमार यांनी देखील चर्चेत सहभागी होत आपली भूमिका मांडली. प्रकल्प लवकर पूर्णत्वास जावा याकरिता शासन आदेश लवकरात लवकर काढण्याचे निर्देश या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले

संत्रा आयात शुल्कात बांगलादेशने वाढ केल्याने संत्रा दर यंदा दबावात होते. त्यावर तोडगा निघू शकला नाही. प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाल्यास संत्रा उत्पादकांना वाढीव दर मिळणे शक्‍य होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर प्रकल्प लवकर पूर्णत्वास जावा याकरिता पाठपुरावा केला जात आहे.
- देवेंद्र भुयार, आमदार, वरुड-मोर्शी मतदार संघ
वर्षातील ३६५ दिवसांपैकी बराच कालावधी हा प्रकल्प चालावा याकरिता मल्टिलाइन प्रकल्प प्रस्तावित करण्याविषयीची सूचना करण्यात आली.
- रमेश जिचकार, संचालक, विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT