Agriculture Input
Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Seized : अप्रमाणित निविष्ठा प्रकरणी वर्षभरात ७२ फौजदारी गुन्हे

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी प्रयोगशाळांमधील तपासणी अहवालांचा आधार घेत जवळपास आठ कोटींच्या अप्रमाणित निविष्ठा जप्त केल्या गेल्या आहेत. तसेच ७२ प्रकरणांमध्ये कृषी विभागाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात निविष्ठा उत्पादकांची संख्या ११०० आहे. मात्र परवानाधारक निविष्ठा विक्रेते सव्वा लाख आहेत. त्यातील अनेकांकडे बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीचे एकत्रित परवाने आहेत.

त्यामुळे विक्रेत्यांची संख्या जास्त वाटते. गेल्या हंगामात किमान ६१ हजार नमुने तपासावेत, असे उद्दिष्ट कृषी विभागाने राज्यभरातील गुणनियंत्रण निरीक्षकांना दिले होते. उद्दिष्टांच्या तुलनेत ५५ हजार म्हणजेच ९० टक्के नमुने तपासले गेले. या तपासणीच्या आधारे २४७७ प्रकरणांमध्ये न्यायालयात दावे दाखल केले गेले; तर ७२ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई केली गेली.

निविष्ठांची निर्मिती छोट्यामोठ्या कंपन्यांकडून केली जाते. या कंपन्यांचे स्वतःचे वितरण जाळेही असते. परंतु शेतकऱ्यांना गावागावांत निविष्ठा पुरविण्याची मुख्य जबाबदारी स्थानिक विक्रेते पार पाडतात. त्यामुळे कंपन्यांपेक्षाही गावातील कृषी सेवा केंद्रांशी शेतकऱ्यांचे घनिष्ठ संबंध असतात. ‘‘कृषी विभाग किंवा कृषी शास्त्रज्ञांपेक्षाही स्थानिक निविष्ठा विक्रेत्यांने दिलेला सल्ला शेतकरी ऐकतात. निम्म्याहून अधिक निविष्ठा विक्री केवळ विकेत्यांच्या शिफारशींवर चालते. त्यामुळे कृषी विभागाला स्थानिक विक्री केंद्रांवर जास्त लक्ष ठेवावे लागते,’’ असे एका गुणनियंत्रण निरीक्षकाने सांगितले.

निविष्ठा विक्रीत गैरप्रकार उघड होताच जप्तीची कारवाई होते. गेल्या हंगामात ३.८७ कोटी रुपयांचे बियाणे, तसेच ३.७० कोटींची अप्रमाणित खते जप्त केली गेली. जप्तीच्या कारवाईत कीटकनाशके तुलनेने कमी असून, त्यांची किंमत ४८ लाख रुपयांच्या आसपास आहे. गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत ७०० विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले गेले. परंतु ही कारवाई तात्पुरती असते.

अर्थात, १४३ प्रकरणांमध्ये विक्रेत्यांची चूक गंभीर स्वरूपाची होती. त्यामुळे परवाने थेट रद्द केले गेले आहेत. या बाबत निविष्ठा विक्रेत्यांच्या एका राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, की कृषी विभागाने उत्पादनस्तरावर लक्ष केंद्रित केले तर गुणनियंत्रण अधिक चोख होईल. कारण, निविष्ठांमधील भेसळ विक्रेत्यांच्या नव्हे; तर उत्पादकांच्या पातळीवर चालते.

सर्वाधिक गैरप्रकार खतविक्रीत

राज्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षात एकूण ५० हजार निविष्ठा नमुन्यांची तपासणी झाली. त्यात २५१९९ ठिकाणी बियाणे, १७१९७ ठिकाणी खते; तर ७७९८ प्रकरणांमध्ये कीटकनाशकांचे नमुने तपासण्यात आले. यातील चार हजारांहून अधिक नमुने अप्रमाणित निघाले. यात बियाण्यांचे १९०४, खतांचे २१११ तर कीटकनाशकांचे ३७४ नमुने अप्रमाणित होते. त्यामुळे निविष्ठा क्षेत्राच सर्वाधिक गैरप्रकार खतविक्रीत होत असल्याचे स्पष्ट होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : बीडमध्ये ७२ हजार ४१० लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी

Water Crisis : मराठवाड्यातील ९३ लघू- मध्यम प्रकल्प कोरडे

Milk Rate Protest : दूध दर वाढीसाठीच्या आंदोलनांची धग कायम

Nagar Urban Bank : बँक बुडवणार्‍यांवर जबाबदारी निश्चिती करा; केंद्रीय सहकार मंत्रालयाचे आदेश

Ashadhi Wari 2024 : संत तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखींचा पुणे शहरात प्रवेश; वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT