Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Agriculture Input : कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, काही कृषी अधिकाऱ्यांना हाताशी धरीत निविष्ठा उत्पादक संस्थेने हजारो लिटर अन्नद्रव्याचा पुरवठा शेतकऱ्यांना केला.
Agriculture Input
Agriculture InputAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून राज्यात गेल्या वर्षात राबविलेल्या अन्न व पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक प्रात्यक्षिक योजनेत कृषी खात्याने शेतकऱ्यांना अप्रमाणित निविष्ठा पुरवल्याचे उघड झाले आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, काही कृषी अधिकाऱ्यांना हाताशी धरीत निविष्ठा उत्पादक संस्थेने हजारो लिटर अन्नद्रव्याचा पुरवठा शेतकऱ्यांना केला.

या निविष्ठा तयार करणाऱ्या संस्थेकडे उत्पादनाचा परवाना नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून, वस्तुस्थितिदर्शक अहवाल तत्काळ कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. एका तालुका कृषी अधिकाऱ्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला (एसएओ) पाठवलेल्या पत्रात अप्रमाणित निविष्ठांचा उल्लेख आहे.

Agriculture Input
Agriculture Input Bill : बनावट, बोगस निविष्ठा विधेयके लटकणार

विशेष म्हणजे एसएओंच्या सांगण्यानुसार निविष्ठा खरेदी झालेली आहे. ‘‘आपल्या आदेशानुसार खरीप हंगामातील अन्न व पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक प्रात्यक्षिकांसाठी रावेरच्या कृषी विज्ञान केंद्रातून दहा हजार ६२५ लिटर सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा निविष्ठा म्हणून केला गेला.

परंतु या निविष्ठांचा नमुना रासायनिक खत चाचणी प्रयोगशाळेत तपासला असता अप्रमाणित निघाला आहे,’’ असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणारे नेमके काय झाले याविषयी कृषी आयुक्तालयाला कळविण्यात आलेले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Agriculture Input
Agriculture Inputs : निकृष्ट निविष्ठांवर नियंत्रण हवेच

दरम्यान, या प्रकरणी कृषी आयुक्तालयाकडे एक लेखी तक्रार आलेली आहे. ही तक्रार अद्याप निकालात काढण्यात आलेली नाही. राज्यात सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणाऱ्या जळगावच्या संबंधित कृषी विज्ञान केंद्राला कृषी आयुक्तालयाने परवाना कधी दिला, गेल्या दहा वर्षांत या केंद्राने किती निविष्ठांचे उत्पादन केले, निविष्ठांचे नमुने कितीवेळा तपासले, या केंद्राला कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी कितीवेळा भेटी दिल्या याचा तपशील देण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आलेली आहे.

निविष्ठा पुरवल्या; पण माहिती नाही

राज्यात अन्न व पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक प्रात्यक्षिक योजनेत निविष्ठांचा पुरवठा झाला आहे. परंतु, त्याबाबत निश्‍चित माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असे लेखी उत्तर कृषी आयुक्तालयाने संबंधित तक्रारदाराला दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणखी वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com