Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Insurance : खरिपाची ७१५० कोटी विमा भरपाई मंजूर

Kharif Season : खरीप हंगाम २०२३ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : खरीप हंगाम २०२३ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरअंतर्गत तब्बल ७ हजार १४९ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे.

आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे. यापैकी ३ हजार ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झाले. उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरू आहे, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळण्यास केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे मदत झाली. या बदलामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईची रक्कम जादा मिळाल्याचे सांगितले जाते.

गेल्या खरिपात राज्यात पाऊस कमी पडला होता. अनेक मंडलांमध्ये पेरणीच करता आली नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा भरपाई लागू झाली. पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज ३६ हजार ६८४ होते. या शेतकऱ्यांना १४ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली होती. जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे.

अग्रिमची रक्कम २,५७८ कोटी ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अनेक मंडलांमध्ये पावसात मोठा खंड पडला. त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू झाला आणि शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना अनेक जिल्ह्यांमध्ये निघाल्या.

कंपन्यांनी नाही हो नाही करत शेवटी अग्रिम मंजूर केला. अग्रिमसाठी तब्बल ५६ लाख ४३ हजार अर्ज पात्र ठरले. या शेतकऱ्यांना २ हजार ५७८ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २ हजार ५५४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले. आता अग्रिम भरपाईचे केवळ २४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती

सप्टेंबर आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याअंती भरपाई मंजूर झाली.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी १९ लाख ८५ हजार विमा अर्ज पात्र ठरले. त्यापोटी शेतकऱ्यांना १ हजार ४२६ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी १ हजार ६८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उरलेले ३५८ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

काढणीपश्‍चात भरपाई

पीक काढणीपश्‍चात नुकसान भरपाईसाठी जवळपास दीड लाख अर्ज पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ११६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उरलेले ५० हजार कोटी लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पीक कापणी प्रयोगातून ३,०१३ कोटी मंजूर

पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आकडा सर्वाधिक आहे. केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी नुकसान भरपाई देण्याच्या सूत्रात बदल केला. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळण्यास मदत झाली.

पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी ३२ लाख ४४ हजार अर्ज पात्र ठरले. त्यापोटी शेतकऱ्यांना ३ हजार १३ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी २६२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले. उरलेले २ हजार ७५१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पीकविम्याची स्थिती

पात्र अर्ज :

१ कोटी १० लाख ५३ हजार

मंजूर विमा भरपाई :

७ हजार १४९ कोटी रुपये

खात्यात जमा :

३ हजार ९६५ कोटी रुपये

शिल्लक रक्कम :

३ हजार ८३ कोटी रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage : अमरावती जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईची चाहूल

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांचे ८१२ कोटी अडकले आचारसंहितेत

Sindhudurg Farmers : कापणी सोडाच; शेतात जायचीच इच्छा मेली, कृषी विभाग पंचनाम्यालाही आलं नाही

Devendra Fadnavis : सत्ता द्या, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, फडणवीस यांची घोषणा

Jayakwadi Canal : जायकवाडी डाव्या कालव्याच्या पाणी आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT