Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : सांगलीतील ७१ हजार शेतकरी २५ टक्के अग्रिमच्या प्रतीक्षेत

Crop Insurance Scheme : खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७५८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेतला.

Team Agrowon

Sangli News : खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७५८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना २२ कोटी ४ लाख अग्रिमचा पीकविमा मंजूर झाला आहे.

त्यापैकी ७१३६४ शेतकऱ्यांना १७ कोटी ९३ लाख १८ हजार ७४७ रक्कम दिवाळी पूर्वी वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप अग्रिम पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. ३ लाख ७७ हजार ७५८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ९१५ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले. मात्र, जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्याबाबत जिल्हा स्तरावर बैठकही झाली. त्यानुसार कृषी विभागाने सर्वेक्षणही केले, त्याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे सादरही केला. अंतरिम नुकसान भरपाईअंतर्गत (एमएसए)) विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्याबाबत आदेश दिले होते.

जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना २२ कोटी ४ लाख अग्रिमचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी ७१ हजार ३६४ शेतकरी पात्र झाले आहे. या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी १७ कोटी ९३ लाख १८ हजार ७४७ रक्कम मंजूर झाली.

ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलाी जाणार, असे जाहीर केले होते. मात्र, दिवाळीनंतर पंधरा दिवस होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप अग्रिम पीकविमा जमा झाला नाही.

तालुकानिहाय अग्रिमसाठी

पात्र शेतकरी आणि रक्कम

तालुका शेतकरी संख्या विमा रक्कम (रुपयांत)

आटपाडी ८४५८ १,८०,३४,४३५

जत ७१०५ १,२२,६३,११७

कडेगाव ८०८५ १,९१,१४,६६७

कवठेमहांकाळ १३२२३ २,५२,२३,०९७

खानापूर ९११४ १,९५,१५,५८२

तासगाव ८५०९ १,९६,७३,६००

वाळवा ६६२९ १,०९,४५,२६२

मिरज १०२३१ ५,४५,४८,९८७

एकूण ७१३६४ १७,९३,१८,७४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT