Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : कपाशीची ७१ टक्के, तर सोयाबीनची दीड पट पेरणी

Team Agrowon

Beed News : बीड जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख ४ हजार ६६ म्हणजे जवळपास ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. या पेरणीत कपाशीच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१ टक्के क्षेत्रावर लागवडीला, तर सोयाबीनच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४५ टक्के क्षेत्रावर पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पावसाच्या असमान बरसण्याने अजून अपेक्षित पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.

बीड जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित ७ लाख ८५,७८६ एकर क्षेत्रात बीड तालुक्यातील १ लाख १९ हजार ९७५ हेक्टर, पाटोद्यातील ५६ हजार ८६५, आष्टीतील ९३ हजार हेक्टर, शिरूरमधील ५० हजार ७२९ हेक्टर, माजलगावातील ६८ हजार ७१३ हेक्टर, गेवराईतील १ लाख ६ हजार ३६७ हेक्टर, धारूरमधील ४१ हजार १८२ हेक्टर, वडवणीतील २९ हजार ९९५ हेक्टर,

अंबाजोगाईतील ६९ हजार ५२० हेक्टर, केजमधील ९२ हजार १८२ हेक्टर तर परळीतील ५७ हजार २५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. ३ जुलैपर्यंत पेरणी झालेल्या एकूण ७ लाख ४ हजार ६६ हेक्टर क्षेत्रामध्ये बीडमधील १ लाख १० हजार ३३ हेक्टर, पाटोद्यातील ४५ हजार २६२ हेक्टर, आष्टीतील ७५ हजार ६० हेक्टर, शिरूर मधील ४४ हजार १५८ हेक्टर, माजलगाव ५६ हजार ६८१ हेक्टर, गेवराईतील ९३ हजार ६०४ हेक्टर,

धारूरमधील ४२ हजार २९ हेक्टर, वडवणीतील २५ हजार ६५३ हेक्टर, अंबाजोगाई ६९ हजार २९० हेक्टर, केजमधील ८९ हजार ६२५ हेक्टर तर परळीतील ५२ हजार ६७१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील धारूर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन तर अंबाजोगाई तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली आहे. इतर तालुक्यांत अजून अपेक्षित पेरणी होणे बाकी आहे.

जिल्ह्यात १४५ टक्के सोयाबीनचा पेरा

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २६ हजार २३४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख २८ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. असे असताना गेवराई तालुक्यात मात्र सोयाबीनच्या तालुक्यातील सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

कपाशी २ लाख हेक्टरवर पेरा...

कपाशी उत्पादक जिल्ह्यात बीडचे नाव आहे. तरी यंदा आत्तापर्यंत कपाशीच्या सर्वसाधारण ३ लाख ५५ हजार ४९४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५१ हजार ९७५ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली आहे. पाटोदा तालुक्यात कपाशीच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३ टक्के, तर केज तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ टक्के कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. आष्टी तालुक्यातही कपाशीच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३३ टक्के कपाशी लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

Nana Patole : गोरगरिबांचा आधार

Nana Patole : जनसामान्यांचा आवाज- नाना पटोले

Vidarbha Development : पूर्व विदर्भाचे नवीन विकास मॉडेल- नाना पटोले

SCROLL FOR NEXT