Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation : ‘टेंभू’मुळे ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

Agriculture Irrigation : रब्बी व उन्हाळी हंगामासाठी गेल्या सव्वातीन महिन्यांपासून टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : रब्बी व उन्हाळी हंगामासाठी गेल्या सव्वातीन महिन्यांपासून टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. लाभक्षेत्रातील ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. परिणामी ऐन दुष्काळात मोठा दिलासा मिळाल्याने टेंभूच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळाले आहे.

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई व पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी झाली. त्यानंतर २५ डिसेंबर २०२३ रोजी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले.

तेव्हापासून हे आवर्तन तब्बल सव्वातीन महिने अखंडपणे सुरू आहे. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आवर्तन मेअखेर चालणार आहे. यंदाचा पावसाळा पूर्णपणे कोरडा गेल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. शासनाने दुष्काळी पट्ट्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व सिंचन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

टेंभू योजनेचे आवर्तन गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुरू असून टेंभूच्या पाण्याने कऱ्हाड तालुक्यातील ६००, कडेगावातील ९ हजार ९ हजार ३२५, खानापुरातील १८ हजार ९७५, तासगावातील ७ हजार ७००, तर आटपाडी, कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला असे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण ८० हजार ४७२ लाभक्षेत्रापैकी ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळातही येथे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.

शेतीसह येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. टेंभू योजना सुरू नसती तर आज २००३-०४ पेक्षा मोठ्या दुष्काळाला येथील नागरिकांना सामोरे जावे लागले असते. परंतु टेंभूच्या पाण्याने दुष्काळी भागाला आज खऱ्या अर्थाने तारले आहे. शेतीपिकांना वेळेत व मुबलक पाणी मिळाल्याने येथील पिकांनाही दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार आहेत.

मेअखेर 'टेंभू'चे आवर्तन सुरू राहणार

'टेंभू'चे सध्या सुरू असलेले उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू होऊन तीन महिने झालेले आहेत. तरी हे आवर्तन मेअखेर सुरू राहणार आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डियार यांनी सांगितले.

‘पाणी काटकसरीने वापरावे’

यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने कोयना धरणात मर्यादित पाणीसाठा आहे. तेव्हा पाणीटंचाई लक्षात घेऊन टेंभू आवर्तनाच्या माध्यमातून दिले करणारे पाणी नागरिकांनी जपून व काटकसरीने वापरावे. पाण्याचा कोठेही अपव्यय होता कामा नये, याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डियार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT