Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing: सांगली जिल्ह्यात ७० टक्के पेरणी उरकली

Sangli Sowing: सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६६३ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Sangali News: सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६६३ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीच्या कामात सतत अडथळे निर्माण झाले आहेत.

परिणामी तालुक्यात ५ हजार ६७७ हेक्टरवर म्हणजे २५ टक्क्यांवरच पेरणी झाली आहे. तर सततच्या पावसामुळे भात पिकाची उगवण झाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खरिपाचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर आहे.

त्यापैकी १ लाख ७२ हजार ६६३ हेक्टरवर म्हणजे ७० टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पिकांच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे.

सात तालुक्यांत सुमारे साठ टक्क्यांपेक्षा अधिक पेरा झाला आहे. तर इतर चार तालुक्यांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली. पेरणी अंतिम टप्प्याकडे पोहोचली असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

तालुक्यात यंदा सूर्यफूल पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यात सूर्यफुलाचे ९७५ हेक्टर इतके असून ४७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.दरम्यान, शिराळा तालुक्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र २७ हजार ८७१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ११ हजार ५०० हेक्टर भात पिकाचे क्षेत्र आहे.

शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भात पेरणीची कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी अनेक भागात भाताची पेरणी केली आहे. पावसामुळे मका, सोयाबीन पिकांच्या पेरणीला अडथळे निर्माण झाले आहे. शिराळा तालुक्यात २५ टक्के पेरा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT