Agriculture Damage Flood agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Damage Flood : ७ तालुके ३०० हून अधिक गावातील शेती पाण्यात, नद्यांचे रौद्ररूप शेतकऱ्यांच्या मुळावर

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी काही वर्षे मागे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत दिली आहे परंतु पाणी पातळीत म्हणावी तशी घट होत नसल्याने जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमधील २१ हजार हेक्टर पिकाऊ शेती पूर्णपणे पुरात बुडाली आहे. यात ऊस, भात, सोयाबीन पिके गुदमरत आहेत. आणखी काही दिवस पुराचे पाणी ओसरले नाही, यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी काही वर्षे मागे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

झालेल्या पावसाने सात ते आठ दिवसांपासून नदीकाठच्या शेतात पुराच्या पाण्यात घुसमटणाऱ्या पिकांना वाचवणे मुश्‍कील झाले आहे. सुरळीत पाणी गेल्याने आणाखी काही दिवस उसाचे पीक पाण्यात राहिल्यास त्यांचा पाला कुजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीकाठीच बसून पुराचे पाणी कमी होते का हे पाहण्याशिवाय पर्याय नाही.

पंचगंगा नदी तिरावर असणाऱ्या करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला आहे. दूधगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने हजारो हेक्टर पिकाऊ शेती आपल्या कवेत घेतली आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी कृषी अधिकारी अजय कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीने पूर आला आहे. या पुरात ३०० हून अधिक गावांतील वीस हजार हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी कमी होताच पंचनामा केला जाणार आहे. या शेतात भात, सोयाबीन, ऊस अशी पिके आहेत. पाणी कमी झाल्यानंतरच त्या पिकांची स्थिती समजणार आहे.

सर्वाधिक शेतीला फटका बसलेली गावे

करवीर तालुका

आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, बालिंगे, पाडळी खुर्द, वडणगे, शिंगणापूर, केर्ली, पाडळी बुद्रुक, आडूर, चिंचवाड, गांधीनगर, आरळे, कळंबे तर्फ कळे, नागदेववाडी, सांगरूळ, कुडित्रे, केर्ली, शिये, कोपार्डे, केर्ले, आमशी, कांचनवाडी, कांडगाव, खांटगळे, गाडेबोंडवाडी, चाफोडी, देवाळे, निगवे दुमाला, पासार्डे, भुये, शिंदेवाडी, शेळकेवाडी, वसगडे, भुयेवाडी, कसबा बीड, परिते, चिंचवडे तर्फे कळे, घानवडे, खुपीरे, सडोली दुमाला, सडोली दुमाला, सडोली खालसा, शिरोली दुमाला, महे, हसूर, सावरवाडी, साबळेवाडी, रजपूतवाडी, हळदी.

गगनबावडा तालुका

साळवण, वेतवडे, तळये बुद्रुक, मागेवाडी, शेणवडे, खोकुर्ले, लोंघे, मांडूकली, मणदूर, निवडे, अंसंडोली, साखरी, वसर्डे, कडवे, कोदे बुद्रुक, मुटकेश्र्वर, किरवे, बावेली, करीवडे, अणदूर, सांगशी, जरगी, आसळज, कातळी, बोरबटे, शिळोशी, धुंदवडे आणि गगनबावडा.

राधानगरी तालुका

सोन्याची शिरोली, आवळी बुद्रुक, गुंडेवाडी, तारळे खुर्द, कंथेवाडी, आवळी खुर्द, अणाजे , गुडाळ, कसबा तारळे, करंजफेण, मानबेट, फेजिवडे, गवशी, मासुर्लेी, घोटवडे, कोनोली तर्फ असंडोली, धामोड, कोते, चांदे, एळवडे, राशिवडे बुद्रुक, कौलव, बरगे वाडी, शिरसे, आमजाई व्हरवडे, पुंगाव, राशिवडे खुर्द, शिरगाव, पिरळ, राधानगरी, कुडित्री आणि पाडळी.

हातकणंगले तालुका

शिरोली पुलाची, हुपरी, रुकडी, माणगाव, चोकाक, हालोंडी, रेंदाळ, रुई, इंगळी, अतिग्रे, चंदूर, कबनूर, हातकणंगले, रांगोळी, पट्टण कोडोली, साजणी, टोप आणि तळवणी.

शिरोळ तालुका

शिवनकवाडी, शिरदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, शिरढोण, टाकवडे, तेरवाड, हेरवाड, हरोली, जांभळी, अब्दुल लाट, लाटवाडी.

पन्हाळा तालुका

पोर्ले तर्फे ठाणे, पोंबरे, पुनाळ, किसरुळ, पडसाळी, कोलोली, बाजार भोगाव, तिरपण, यवलूज, कसबा ठाणे, बोरपाडे

शाहुवाडी तालुका

माळापुडे, कातळेवडी, पेंडाखळे, करंजफेण, पाल, मोसम, गेळवडे, मरळी व पारिवणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT