Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Loan : सत्ताधाऱ्यांच्या चार कारखान्यांना ६९२ कोटींच्या कर्जासाठी थकहमी मंजूर

Sugar Factory : राष्ट्रीय सहकार निगमकडून (एनसीडीसी) राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्यात येते. मात्र यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने केवळ सत्ताधारी कारखानदारांना दारे उघडी करण्यात येत आहेत.

Team Agrowon

Mumbai News : सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर मेहरनजर दावण्याचा राज्य सरकारने सपाटा लावला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिंदे गटाच्या तीन आणि भाजपच्या एका सहकारी साखर कारखान्याला ‘एनसीडीसी’च्या ६९२ कोटींच्या कर्जासाठी थकहमी मंजूर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सहकार निगमकडून (एनसीडीसी) राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्यात येते. मात्र यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने केवळ सत्ताधारी कारखानदारांना दारे उघडी करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असलेले विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांची नावे वगळण्यात आली.

तसेच पंढरपूरच्या अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना, अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा अशोक सहकार साखर कारखाना आणि वैभव नायकवडी यांच्या पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना आणि मानसिंग नाईक यांच्या विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यांना नुकतेच कर्ज देण्यात आले. तसेच ११ साखर कारखान्यांना १५९० कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली होती.

आता नव्याने कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांना थकहमी देण्यात आली आहे. यातील तीन कारखाने शिंदे गटाचे तर एक कारखाना भाजपच्या कारखानदाराचा आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून पराभूत झालेले संजय मंडलिक यांच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याला १५० कोटी, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याला २०२ कोटी,

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याला १६४ कोटी, तर भाजपचे खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला १७६ कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT