Land Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : जमिनीचे वाद मिटवून ६५४ जणांचा ‘सलोखा’

Salokha Yojana : जमिनींचा ताबा, वहिवाटीसंर्भातील वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या सलोखा योजनेतून वर्षभरात ६५४ जणांनी लाभ घेतला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : जमिनींचा ताबा, वहिवाटीसंर्भातील वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या सलोखा योजनेतून वर्षभरात ६५४ जणांनी लाभ घेतला आहे. या दस्तनोंदणीत ५ कोटी ९० लाख ६ हजार ७३३ रुपयांची शुल्कमाफी देण्यात आली आहे.

जानेवारी २०२३ मध्ये राज्य सरकारने सलोखा योजनेला महसूल विभागामार्फत सुरुवात केली होती. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली होती. शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील वाद मिटविण्यासाठी, ताब्यातील जमिनींचे योग्य हस्तांतरण करणे सोपे जावे यासाठी ही योजना तयार केली होती. ही योजना दोन वर्षे चालणार आहे. या योजनेअंतर्गत एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून सलोखा करण्यात येत आहे.

चुकीच्या नोंदी, मालकी हक्कांचे वाद, शासकीय योजनांतील त्रुटी, किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमिनीचे वाद मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या वर्षभरात ७ विभागांतील जानेवारीअखेर ६५४ दावे सलोखा योजनेअंतर्गत निकाली काढण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात ५३, तर यवतमाळमध्ये ५०, परभणी जिल्ह्यातील ५६, नगर येथील ५४, रत्नागिरीतील २१ आणि सिंधुदुर्गातील ३०, साताऱ्यातील २६ आणि सांगलीतील २२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १०, जालना २३ आणि बीडमधील ३० दावे, वर्ध्यातील २२ दावे निकाली निघाले आहेत.

विभागनिहाय निकाली दावे

अमरावती...१५४

लातूर...१११

नाशिक...१०८

छत्रपती संभाजीनगर...७१

ठाणे...६३

नागपूर...५९

पुणे...८८

मुंबई...००

एकूण दस्तऐवज : ६५४

मुद्रांक शुल्कांत एकूण माफी : ५ कोटी ९ लाख २ हजार ५४४ रुपये

नोंदणी शुल्क एकूण माफी : ८१ लाख ४ हजार १८९ रुपये

एकूण माफी : ५ कोटी ९० लाख ६ हजार ७३३ रुपये

शेतजमिनीच्या संदर्भातील वाद सलोखा योजनेमुळे मिटत आहे. शेतकऱ्यांमध्ये सौदार्हाची भावना निर्माण होत आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT