Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Free Soybean Seed : चाकूरच्या ६३४ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीनचे बियाणे

Seed Subsidy : खरीप हंगामातील बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

Latur News : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजनेअंतर्गत बियाण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज केलेल्या चाकूर तालुक्यातील ६३४ शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे मिळणार आहे. संबंधित कृषी सेवा केंद्राकडून हे बियाणे घेऊन जाण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामातील बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यानुसार तालुक्यातील ६३४ शेतकऱ्यांची निवड केली आहे. चाकूर शहरातील तीन कृषी सेवा केंद्राकडे या शेतकऱ्यांच्या यादी पाठविण्यात आल्या आहेत. सदर निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टेक फार्मर आयडी व आधार कार्ड सोबत घेऊन जायचे आहे.

पाच दिवसांच्या आत बियाणे खरेदी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची निवड रद्द होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, योजनेसाठी २९ मे पर्यंत मुदत होती.

परंतु महाडीबीटीवर अर्ज अपलोड होण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या यामुळे पुन्हा दोन जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे योजनेतील मोफत बियाण्यांसाठी मुदतवाढ देण्याची शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Import Duty: कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले

Karnataka CM News: कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी डी. के. शिवकुमार, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहुर्त ठरला

Land Acquisition Dispute: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

Banana Crop Management: केळी व्यवस्थापन, खरीप पूर्वतयारीवर आज चर्चासत्र

Chandrapur Water Scarcity: पाणीटंचाईच्या झळांनी चंद्रपूरची होरपळ

SCROLL FOR NEXT