Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : शिरोळ तालुक्यात ६२ टक्के पेरण्या

Kharif Season : शिरोळ तालुक्यात २ हजार २१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण ६२ टक्के असून अद्याप ३८ टक्के पेरण्या होणार आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : शिरोळ तालुक्यात २ हजार २१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण ६२ टक्के असून अद्याप ३८ टक्के पेरण्या होणार आहेत. लहरी पावसाने पेरणीबाबत अद्याप शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

शिरोळ तालुक्यात संभाव्य महापुराचा धोका ओळखून शेतकरी पावसाचा अंदाज घेत खरीप पिकाच्या पेरण्या करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. तालुक्यात आतापर्यंत २ हजार २१ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून याची टक्केवारी ६२ टक्क्यांवर गेली आहे. अद्याप ३८ टक्के शेतकरी पेरण्या करणार आहेत.

तालुक्यात ५० हजार २९२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यामध्ये ४१ हजार ६२८ हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. जवळपास ५३ गावांमध्ये खरीप पिके तर ४५ गावांमध्ये रब्बी पिके घेतली जात असून ३१ हजार २७३ हेक्टर क्षेत्र बागायत तर १० हजार ३५५ हेक्टर जिरायत क्षेत्र आहे.

यात आतापर्यंत सोयाबीन ५९५ हेक्टर, भुईमूग ११७ हेक्टर, उडीद १९० हेक्टर, मूग २५ हेक्टर, मका २१ हेक्टर, भात ७३ हेक्टर अशा पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भाजीपाल्याचे क्षेत्र ३५ हेक्टर आहे. ऊस २७ हजार ६६० हेक्टरवर खोडवा, लागण, सरू व आडसाली याचा समावेश आहे.

शिरोळ तालुक्यात पावसाने चांगली साथ दिली आहे. आतापर्यंत ६२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित शेतकरी नदीकाठावरील असल्याने महापुराचा अंदाज घेत असल्याने ३८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत.

शिरोळ तालुक्यात आतापर्यंत २ हजार २१ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्यात पूर्ण झाल्या आहेत. याची टक्केवारी ६२ असून अद्याप ३८ टक्के पेरण्या होणार आहेत. शिवाय अनेक शेतकरी आडसाली लागण करत आहेत. येत्या आठ दिवसांत सर्व पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे.
- चंद्रकांत जांगळे-पाटील, कृषी अधिकारी, शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT