Sukhoi Crash Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Sukhoi Crash : ‘सुखोई-३०’च्या अपघातामुळे शेतकऱ्यांचे ६१ लाखांचे नुकसान

Farmers Loss : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सुखोई-३० हे लढाऊ विमान कोसळल्याने तीन शेतकऱ्यांचे ६१ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सुखोई-३० हे लढाऊ विमान कोसळल्याने तीन शेतकऱ्यांचे ६१ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे. यात द्राक्ष बाग, तार कंपाउंड, एक लाखाची कोबी, अडीच लाखांच्या कूपनलिका व विहिरीचे नुकसान झाल्याची नोंद गावचे तलाठी केदार यांनी पंचनाम्यात केली.

दरम्यान, नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी या ठिकाणी भेट देत शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ‘सुखोई-३०’ हे लढाऊ विमान मंगळवारी (ता. ४) दुपारी एकला शिरसगाव येथील शेतकरी सुखदेव पोपट मोरे, ज्ञानेश्‍वर नारायण मोरे व लक्ष्मण नारायण मोरे यांच्या शेती गट क्रमांक २६,१३३ व १३२ मध्ये कोसळले.

वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडल्याने जीवितहानी झालेली नाही; परंतु विमान कोसळल्यामुळे द्राक्ष बागेचे, कोबी पिकाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तत्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले.

तलाठी केदार यांनी बुधवारी (ता. ५) घटनेचा पंचनामा केला. यात ०.८५ आर क्षेत्रात असलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले. बागेचे अँगल आणि तारा तुटल्याने त्यांचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ड्रीपच्या नळ्या जळून गेल्याने अंदाजे नुकसान दीड लाख रुपये दिसून येते. पुढील सहा वर्षांच्या द्राक्ष उत्पन्नाचा विचार केला तर ५० लाखांचे उत्पन्न बुडणार आहे.

मागील घटनेच्या मदतीची प्रतीक्षा

निफाड तालुक्यात काही वर्षांपूर्वी विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आता शिरसगावच्या शेतकऱ्यांना तरी मदत मिळणार का, याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT