Crop Damage Survey : पंचनाम्यांच्या फेरचौकशीसाठी विमा अधिकारी तळ ठोकून

Crop Insurance : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक कर्मचाऱ्यांवर अविश्‍वास
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः जिल्ह्यात वादळ, गारपिटीत केळी बागांची मोठी हानी मार्च ते मे या कालावधीत झाली आहे. अजूनही वादळी वारे येत आहेत. यासंदर्भात केळी विमाधारकांच्या सूचना, पंचनाम्यांची फेरतपासणी, चौकशी यासाठी विमा कंपनीचे मुंबई व अन्य भागातील वरिष्ठ अधिकारी जळगावात तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत भारतीय विमा कंपनी (एआयसी) फळ पीकविमा योजनेसंबंधी कार्यरत आहे. सध्या २०२३-२४ च्या हंगामातील प्रस्ताव अन्य बाबींवर कंपनी काम करीत आहे. या कंपनीचे जिल्हा समन्वयक व विविध तालुका समन्वयकही आहेत. परंतु या स्थानिक कर्मचारी व समन्वयकांवर कंपनीच्या वरिष्ठांनी अविश्‍वास दाखवून फेरचौकशी, तपासणी, ढोबळपणे पाहणी यासाठी जळगावातील मुक्काम कायम ठेवला आहे. अनेक दिवसांपासून कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जळगावात येत आहेत. विमा प्रस्ताव, वादळ, गारपिटीचे पंचनामे यात गैरप्रकार, गैरव्यवहार होऊ नयेत, चुकीची माहिती कंपनीकडे येऊन कंपनीचे नुकसान व्हायला नको, यासाठी हे अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

Crop Insurance
Crop Damage Survey : नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

पंचनाम्यांची सूचना शेतकऱ्यांकडून ऑनलाइन आल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ लागलीच संबंधित भागात पोचत आहेत. या भागात केळीची किती हानी झाली आहे, केळीचे क्षेत्र कुठे आहे, संबंधित क्षेत्रासाठी विमा संरक्षण आहे का, याची चौकशी करीत आहेत. काही भागांत याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतरही संबंधित वरिष्ठ फेरचौकशीसाठी जात आहेत. दोन-तीन वेळेस कंपनीचे अधिकारी चौकशी, पाहणीला येत असल्याने शेतकरीही वैतागले आहेत.

जिल्ह्यात वादळ, गारपिटीसंबंधी रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर आदी भागांत नुकसान झाले आहे. या भागातून तक्रारी किंवा ऑनलाइन सूचना दाखल होत आहेत. परंतु त्यावर गतीने काम न करता उलटतपासणी व चौकशीचा ससेमिरा विमा कंपनी लावत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमा कंपनी केवळ आपला लाभ कसा होईल, शेतकऱ्यांना किमान परतावा कसा दिला जाईल, यासाठी आटापिटा करीत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान असतानाही ते कमी दाखविले जात आहे, अशाही तक्रारी आहेत.

मागील हंगामाचे परतावेही द्या
विमा कंपनी आपला नफा, लाभ यासाठी फेरचौकशी, तपासणीचा ससेमिरा शेतकऱ्यांमागे यंदाही लावत आहे. परंतु याच कंपनीने मागील हंगामातील किंवा २०२२-२३ मधील वादळ, गारपिटीच्या नुकसानीचे परतावे किंवा नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. सुमारे चार हजार शेतकरी या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतही विमा कंपनीने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकरी, केळी विमाधारक करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com