Wild Animal Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Attack : वन्यजीवांच्या हल्ल्यात यंदा ६० जण ठार

Animal Attack Update : राज्यात मानव -वन्यजीव संघर्ष वाढला असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ६० जणांचा जीव गेला आहे.

Team Agrowon

Nagpur News : राज्यात मानव -वन्यजीव संघर्ष वाढला असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ६० जणांचा जीव गेला आहे. २०२२ या वर्षात सर्वाधिक १०९ बळी गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढत असताना विदर्भात वाघ-बिबटे व अन्य वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे गावकरी दहशतीखाली वावरताना दिसतात. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ३५ जणांचे बळी गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहे. शेतजमिनीचा विस्तार, विकास कामे, रस्ते रुंदीकरण, उद्योगांसाठी जमीन अधिग्रहण केल्याने जंगल क्षेत्र कमी झालेले आहेत.

याशिवाय आता बिबट्याने आपले वास्तव्य शेतात झालेले आहे. यामुळेही मानव -वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे. याशिवाय नागरी जीवन आणि पायाभूत सुविधांचा विकास करीत असताना वाघांसह वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा विचारात घेतला गेला नाही. त्यामुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. याशिवाय वाघांची संख्याही वाढू लागलेली आहे. वन्यजीव प्रेमींसाठी सुखद धक्का देणारी असताना तेथील रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे.

हत्ती आणि मानव संघर्ष वाढतोय

वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यजीवांच्या हल्ल्याच्याही धक्कादायक घटना अलीकडे घडल्या आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यात सातत्याने वाढ झालेली होती. यंदा मात्र, त्यात विक्रमी घट झालेली आहे. हे चांगले चित्र आहे. यात सर्वाधिक १०९ बळी २०२२ मध्ये गेले होते. २०२१ या वर्षांत ८४ जणांचे बळी गेले होते.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीपोटी कोट्यवधीचा निधी दिला गेला आहे. सर्वाधिक २४ मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात झालेले आहेत. त्यात सर्वाधिक २१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालेले आहे. गेल्या तीन वर्षापासून ओडिशामधून विदर्भात हत्ती येऊ लागले आहेत. तेव्हापासून आता हत्ती आणि मानव संघर्ष वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा तीन जणांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे.

वर्ष मृत्यू

२०२१ ८४

२०२२ १०९

२०२३ ६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT