Wild Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षात १६ बळी

वन्यप्राणी आपली भूक भागविण्यासाठी जंगलालतगच्या नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागल्याची स्थिती आहे.
Wild Life Attack
Wild Life AttackAgrowon

Bhandara News : मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठीचे प्रयत्न होत असताना जिल्हयात गेल्या पाच वर्षात अशा घटनांमध्ये तब्बल १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. वनविभागाने या पार्श्‍वभूमीवर ४ कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण केले आहे.

वनक्षेत्रात चराई क्षेत्र त्यासोबतच खाण्यापिण्यासाठीचे इतर स्रोत गेल्याकाही वर्षात झपाट्याने घटत असल्याची स्थिती आहे. त्यामुळेच वन्यप्राणी आपली भूक भागविण्यासाठी जंगलालतगच्या नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागल्याची स्थिती आहे.

त्यातूनच भंडारा जिल्हयात एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत १६ जणांचे प्राण गेले तर ३४७ इसम किरकोळ व गंभीर जखमी झाले. त्यातही २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये जखमी व मृत्यूमुखींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.

Wild Life Attack
Animal Exhibition : राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात अठरा प्रकारच्या चाऱ्यांचे प्रदर्शन

पाच वर्षात ३४७ जखमींना २ कोटी ८ लाख ९७ हजार ५८३ रुपयांची तर १६ जण ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना २ कोटी ८ लाख रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली.

गेल्या पाच वर्षात पीक नुकसानीच्या सुमारे १५,८५७ प्रकरणात १२ कोटी २८ लाख २ हजार ३५२ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. याकरिता शेतकऱ्यांना वनविभागाला निर्धारित वेळेत सूचना द्यावी लागते.

त्यानंतर संबंधित विभागाकडून पंचनामा व सर्व्हेक्षण करून भरपाईचा निर्णय घेतला जातो. नजीकच्या काळात या भरपाईत वाढ करण्यात आली आहे. पशुधनाची हानी झाल्यास त्याला देखील मदतीची तरतूद आहे.

भंडारा जिल्हयात गेल्या पाच वर्षात पशुहानीच्या १८१९ दाखल प्रकरणात १ कोटी ८० लाख ५९ हजार ३८५ रुपये वितरित केले आहेत.

Wild Life Attack
Animal Care : व्याल्यानंतर गाई - म्हशींना कसा आहार द्यावा?

वर्षनिहाय्य जखमी व भरपाई (रुपयात)

२०१७-१८- ७४ - १३,४०,०२२

२०१८-१९- ३५ - ९,१०,३३९

२०१९-२०- ५६- ३२,९८,९६२

२०२०-२१ - ३४ - ४०,११,०००

२०२१-२२ - ५१ - ५८,४१,८८८

एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२- ९७- ५४,९५,३७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com