Mazi Ladki Bahin Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: ६० लाख लाडक्या बहीणींना बाहेरचा रस्ता दाखवणार; सर्व अर्जांची काटेकोर तपासणीला सुरुवात

Government Scrutiny : महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची तपासणी सुरू केली असून, विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांना योजनेतून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अंदाजे ६० लाख महिलांना बाहेर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : सरकार राज्यातील ६० लाख लाडक्या बहीणींना योजनेतून बाहेर करण्याची शक्यता आहे. सरकारने कोणत्या महिला संजय गांधी निराधार योजना, नमो सन्मान आणि पीएम-किसान, कृषी विभागाच्या अवजारे अनुदान योजनेचा लाभ घेतला, शिवाय कोणत्या महिल्यांच्या कुटूंबाकडे चारचाकी वाहन आहे आणि आयकरदाता आहे याची तपासणी सुरु केली. विविध विभागांकडून यादी मागवून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यातून किमान ६० लाख महिला योजनेतून बाहेर पडू शकतात, असा अंदाज आहे. 

महिला आणि बालविकास विभागाने लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाणणी सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी केली जात आहे. शेती अवजारांसाठी कृषी विभागाचे अनुदान, संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी सन्मान योजना यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या कोणत्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतला, याची पडताळणी केली जात आहे. महीला आणि बालविकास विभागाने या योजना राबविणाऱ्या इतर विभागांकडून लाभार्थी महिलांची यादी मागवली आहे. या यादीची लाडकी बहीण योजनेच्या यादीशी पडताळणी केली जाणार आहे.

सरकार तिजोरीवर आलेला भार कमी करण्यासाठी अपात्र महिलांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. सध्या २ कोटी ४६ लाख महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. त्यासाठी वर्षाला ४२ हजार कोटी लागतील. सरकार एप्रिलपासून महिन्याला २१०० रुपये देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी ६० हजार कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतील. हा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीला सहन करता येणार नाही. त्यामुळे सरकार नियमांवर बोट ठेऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेच्या बाहेर करणार आहे. 

संजय गांधी निराधार योजनेतून राज्यातील २५ लाखांपेक्षा जास्त महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान योजनेतून १८ लाख १८ हजार महिलांना महिन्याला १ हजार रुपये मिळतात. या महिला देखील रडावर आहेत. तसेच डीबीटीद्वारे जवळपास १ लाख ७१ हजार महिलांना शेती अवजारे खरेदीसाठी कृषी विभागामार्फत अनुदान मिळाले आहे. या महिलाही सरकारच्या रडावर आहेत. 

तसेच महिला आणि बालविकास विभागाने परिवहन विभागाकडून कोणत्या कुटुंबांकडे चार चाकी गाड्या आहेत त्याचीही यादी मागितली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या निकषात चार चाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. म्हणजेच सरकार कुटुंबाकडे चारचाकी वाहन असताना कुणी लाभ घेत आहे का? याची पडताळणी करत आहे. अशा महिलांना वगळले जाणार आहे. 

तसेच महिलाआणि बालविकास विभागाने आयकर विभागाकडूनही माहीती मागवली आहे. म्हणजेच आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासही विभाग सांगणार आहे. यातून आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांची माहिती पुढे येईल, असेही महीला आणि बालविकास विभागाने म्हटले आहे. 

महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतानाच सरकारने सर्व नियम स्पष्ट केले होते. तुम्हाला इतर योजनांमधून लाभ मिळत असतील तर फक्त फरक मिळेल. म्हणजेच पीएमकिसान-नमो सन्मान योजनेतून महिन्याला १ हजार मिळत असतील तर त्या महिलेला केवळ ५०० रुपये मिळतील. तसेच संजय गांधी निराधार योजनेतून १५०० रुपये मिळतात. त्यामुळे या महिलांना कोणताच लाभ मिळणार नाही. 

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम कठोर करण्याला सरकारने सुरुवात केली आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर अर्ज केलेल्या सर्व महिलांना कोणतीही पडताळणी न करता लाभ देण्यात आला होता. पण आधीच रिकामी झालेली तिजोरी आणि वाढता भार यामुळे नव्या सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकार आता योजनेत आलेल्या अर्जांटी पडताळणी करत आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT