Sharad Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

Fake campaign against Ladki Bahin scheme: ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महाविकास आघाडीविरोधात महायुतीने खोटा प्रचार केला. त्यामुळे महिलांनी आमच्याविरोधात मतदान केले. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नसला तरी लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Satara News : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महाविकास आघाडीविरोधात महायुतीने खोटा प्रचार केला. त्यामुळे महिलांनी आमच्याविरोधात मतदान केले. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नसला तरी लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे.

आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा जोमाने कामाला लागणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. बटेंगें तो कटेंगेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निकालात महायुतीला सर्वांत जास्त जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर शरद पवार रविवारी (ता. २४) कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘महायुतीने ‘लाडकी बहीण योजने’बाबत महाविकास आघाडीविरोधात खोटा प्रचार केला. हे सरकार गेले तर ‘मविआ’ लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार महायुतीने केला.

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

त्यामुळे महिलांनी आमच्याविरोधात मतदान केले असल्याचे काही कार्यकर्त्यांनी मला सांगितले. त्यामुळे याचा फटका आम्हाला बसला असावा. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे.

लोकसभेच्या निकालानंतर आम्हाला जास्त विश्वास होता. आता परत जोमाने कामाला लागणार आहोत. तळागाळात जाऊन अजून चांगले काम करणार आहोत. अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणार आहोत.’’

Sharad Pawar
Sharad Pawar : तासगाव साखर कारखान्याची दयनीय अवस्था करणाऱ्यांना जागा दाखवा; शरद पवार

शरद पवार म्हणाले, की अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणे गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज गेला असता. तसेच नवखा आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती.

त्यामुळे अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी, युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला.

निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ‘ईव्हीएम’वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवार यांनी, याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळे मी ईव्हीएमवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेऊन याबाबत अधिक बोलेन, असे सांगितले.

मी काही घरी बसणार नाही

पराभवानंतर शरद पवार घरी बसतील, अशी टिप्पणी त्यांचे काही विरोधक करत आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, की मी काही घरी बसणार नाही. काल निकाल लागला आणि आज मी कऱ्हाडमध्ये आहे. दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर लगेच राज्यात येऊन पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे.

विरोधी पक्षनेता असणे कधीही योग्य आहे. त्यासाठी लागणारे संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हा सरकारचा निर्णय आहे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com