Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : खडकवासलातून शेतीसाठी मिळणार ६० दिवस पाणी

Rabi Season Irrigation : खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या रब्बी आवर्तनाला सोमवारपासून (ता. २७) सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या रब्बी आवर्तनाला सोमवारपासून (ता. २७) सुरुवात झाली आहे. कालव्याद्वारे हे आवर्तन सोडले असून, ते सुमारे ५.५ टीएमसीचे असेल. पुढील सुमारे ६० दिवस हे आवर्तन सुरू राहील, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत २५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे आवर्तन सोमवारपासून सोडण्यात आले आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील हे पहिलेच आवर्तन आहे.

दरम्यान, खडकवासला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या साखळी प्रकल्पांत एकूण २५.७३ टीएमसी म्हणजे ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात सुमारे दीड टीएमसी एवढा कमी पाणीसाठा आहे.

यंदा खडकवासलातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सिंचनासाठी उन्हाळी हंगामात पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.

परिणामी, पुणे महापालिकेने नियंत्रित पाणीवापर केल्यास उन्हाळी हंगामात चारा पिके व ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देणे शक्य होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने या बैठकीत सादर केली होती.

सोमवारपासून पाणी सोडल्याने दौंड, इंदापूर, हवेली या तालुक्यांतील रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारी, हरभरा, गहू, चारा पिकांना फायदा होणार आहे. तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT