Water Shortage in Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Water Shortage : परभणी जिल्ह्यातील ६ लघू तलाव कोरडे

Water Issue : लांबलेला पाऊस, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांनी परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ६ लघू तलाव कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Parbhani Water News : लांबलेला पाऊस, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांनी परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ६ लघू तलाव कोरडे पडले आहेत. उपयुक्त साठा संपल्यामुळे ८ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित ८ तलावांमध्ये सरासरी ७ टक्के उपयुक्त पाणासाठा शिल्लक होता. कोरडे पडलेल्या अवलंबून असलेल्या गावात पाणीटंचाई उद्‍भवली आहे.

चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा, देवगाव, चिंचोली, केहाळ (सर्व ता. जिंतूर) हे ६ लघू तलावांतील पाणीसाठा संपल्यामुळे ते कोरडे पडले आहेत.

उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव (ता. गंगाखेड), कोद्री (ता. गंगाखेड), आडगाव (ता. जिंतूर), मांडवा (ता. जिंतूर), दहेगाव (ता. जिंतूर) या ८ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित ८ लघू तलावांमध्ये गुरुवारी (ता. २२) सरासरी ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

त्यात वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, भोसी (ता. जिंतूर) येथील तलावात १४ टक्के, कवड (ता. जिंतूर) येथील तलावात १ टक्का, पाडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

झरी (ता. पाथरी) येथील तलावात ५७ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील तलावात १६ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ३४ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) येथील तलावात २२ टक्के पाणीसाठा होता.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघू तलावांत सरासरी ६.८८३ दलघमी (१६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. गुरुवारी (ता. २२) जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पात सरासरी २० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यात करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पांमध्ये २० टक्के तर मासोळी (ता. गंगाखेड) येथील मध्यम प्रकल्पात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला मध्यम प्रकल्पात सरासरी १३ टक्के पाणीसाठा होता. पाणलोटक्षेत्रात मोठा पाऊस झाले नाही. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. उपसा, तापमानातील वाढ आदी कारणांमुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये घट होऊन तलाव कोरडे पडत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT