Water Shortage : लघू पाटबंधारेतील पाणीसाठा घटला

Irrigation Update : लांबलेला पाऊस आणि उन्हाचा वाढता कडाका यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.
Dhule Water Shortage
Dhule Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : लांबलेला पाऊस आणि उन्हाचा वाढता कडाका यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. एकूण सरासरी २३ टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे. त्याचा परिणाम भविष्यात पाणी टंचाईच्या तीव्रतेवर होणार आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला. अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा परिणाम झाला नाही. उन्हाचे चटके सहन करावेच लागत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज होता;

मात्र बिपॉरजॉय चक्रीवादळानंतर कोकणात वाऱ्याचा वेग मंदावला आणि पाऊसही लांबला. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात बुधवारपासून (ता. २१) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पाऊस पडेपर्यंत उष्म्याची लाट राज्यात कायम राहणार आहे.

आतापर्यंत वीस दिवसांत जिल्ह्यात सरासरी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातील धरणक्षेत्रात पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. उष्म्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे साठाही कमी होत आहे.

Dhule Water Shortage
Lift Irrigation Scheme : उपसा सिंचन योजनांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

कोयनेसारख्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये आहे. मध्यम प्रकल्पांत नातूवाडीमध्ये ६.३४३ दलघनमीटर, गडनदीमध्ये ५५ दलघनमीटर, अर्जुना प्रकल्पात ५६ दलघनमीटर, मुचकुंदीमध्ये १४.६६ दलघनमीटर साठा आहे.

नातूवाडी प्रकल्पात एकूण साठ्याच्या २३ टक्केच पाणी उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की स्रोत कमी झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

सध्या अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा असून आठवडाभर आगमन लांबले तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

चौदा धरणांत शून्य साठा

धरणातील शून्य पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चिंचाळी, सुकोंडी, टांगर, तिवरे, तेलेवाडी, केळंबा, हर्देखळे, पन्हाळे, कोंडगे, कशेळी, परुळे, गोपाळवाडी, जुवाटी, कोंडवाडी यांचा समावेश आहे.

Dhule Water Shortage
Drip Irrigation Benefits : ठिबक सिंचनाचे तंत्र समजून घेणे का आहे महत्त्वाचे?

दहा टक्क्यांपेक्षा कमी

साठा असलेली धरणे

प्रकल्प - पाणीसाठा (दलघनमीटर)

कोंडीवली -०.०५३

मालघर - ०.००६

कळवंडे - ०.१५०

अडरे - ०.११३

फणसवाडी - ०.१७६

शिळ - ०.३०१

गव्हाणे - ०.१७६

तळवडे - ०.०४४

दिवाळवाडी - ०.३६८

कोंडये- ०.००८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com